पाचशे रुपयाच्या बनावट नोटा जप्त, तब्बल पाच आरोपीस सहकारनगर पोलीसांन कडुन जेरबंद

पाचशे रुपयाच्या बनावट नोटा जप्त, तब्बल पाच आरोपीस सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचेकडुन जेरबंद

पुणे (ऑनलाईन न्यूज परिवर्तनाचासामना)पाचशे रुपयाचा बनावट नोटा चालनात आणणाऱ्या टोळीला सहकार नगर पोलिसांनी अटक केली आहे आठ जानेवारी ला वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन करपसे यांचे आदेशाने सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार सहकारनगर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना कारवाई करण्यात आली आहे

पुणे सातारा रोडवरील पद्‌मावती बसस्टॉपसमोर आलो असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व महेश मंडलीक यांना एक इसम गडबडीने स्वारगेटचे दिशेने जावु लागल्याचा दिसला त्याचा संशय आल्याने त्याचा पाठलाग करुन त्यास थोड्याच अंतरावर जागीच पकडुन त्यास आम्हास पाहून गडबडीत निघुन जाण्याचे कारण विचारुन त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव निलेश हिरानंद विरकर वय ३३ वर्षे व्यवसाय नोकरी रा. विष्णु गावडे चाळ रेल्वे रिझर्व्हेशन सेंटर जवळ चिंचवड स्टेशन समोर चिंचवड पुणे असे सांगितले

सदर इसमास तेथून गडबडीत निधुन जाण्याचे कारण विचारता तो उड़या उडवीची उत्तरे देवु लागला. त्याचेकडे विचारणा करीत असताना तो त्याचे पेंटचे डावे खिशात सारखा हात घालुन काहीतरी लपवीत असल्याचे दिसल्याने व त्याचा संशय आल्याने त्याचे खिशे तपासून पाहता त्याचे खिशात ५००/-रुपये किमतीच्या नोटांचा एक बंडल मिळून आला त्याच्याकडे सविस्तर चौकशी केल्यावर हार्दिक सगळा प्रकार उघडकीस आला

. त्याबाबत त्याचेकडे विचारपुस केली असता तो कोणतेही समाधानकारक उत्तर देवु शकला नाही. त्यास पुन्हा विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, सदरच्या नोटा नकली असुन त्या मी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवुन नकली नोटा चलनात चालविण्यासाठी जवळ बाळगल्या होत्या असे सांगीतले

. सदर आरोपीचे ताब्यातुन ५००/-रुपये दराच्या एकूण २५० नकली चलनी नोटा गुन्हयाचे पुरावेकामी जप्त करण्यात आल्या असुन सहकारनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ३३९/२०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १८० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सपोनि सागर पाटील व पोलीस अंमलदार करीत असताना सदरच्या नकली नोटा आरोपी निलेश विरकर याला कोपर खेरने नवी मुंबई येथील १) शाहीद कुरेशी २) सैफान पटेल ३) अफजल शहा यांनी त्याला दिल्या असल्याची माहिती त्याने दिली

सैफान कैयुम पटेल वय २६ वर्षे रा. सेक्टर १२ ई सत्तार पडन बिल्डींग कोपर खेरने नवी मुंबई अफजल समसुद्दीन शहा वय १९ वर्षे रा. सेक्टर १२ ई झमझम अपार्टमेंट कोपर खेरने नवी मुंबई यांना सदरच्या गुन्हयात अटक करण्यात आली

शाहीद जक्की कुरेशी वय २५ वर्षे धंदा चिकन सेंटर रा. सेक्टर १२ ई झमझम अपार्टमेंट दुसरा मजला घर नं.२०२ कोपर खेरने नवी मुंबई यास अटक करण्यात आली.

आरोपी शाहीद कुरेशी यास विश्वासात घेवुन तपास करता त्याला नकली नोटा शाहफहड अंसारी याचेकडुन आल्याची व त्याचेकडे आणखी काही नकली नोटा असल्याची त्याने माहिती दिली.

त्यावरून दि.२५/१०/२०२४ रोजी शाहफहड ऊर्फ सोनु फिरोज अंसारी वय २२ वर्षे रा. जन्मत वेल्फेअर सोसायटी मीना अपार्टमेंट चौथा मजला रुम नं.४११ साडी कंपाऊंड नालासोपारा पूर्व पालघर ठाणे यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आली

१. निलेश हिरानंद विरकर २. सैफान कैयुम पटेल ३. अफजल समसुद्दीन शहा ४. शाहीद जक्की कुरेशी ५. शाहफहड ऊर्फ सोनु फिरोज अंसारी असे एकुण ५ आरोपीना अटक करण्यात आली असुन त्यांचे कडुन ५०० रुपये दराच्या १०,३५,०००/- किंमतीच्या एकुण २०७० नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

शाहफहड ऊर्फ सोनु फिरोज अंसारी याचे कडे तपास करता सदरच्या नकली नोटा त्याने दिल्ली तसेच गाझीयाबाद, राज्य उत्तर प्रदेश येथुन आणल्याचे सांगितलेने सहकारनगर पोलीस स्टेशन कडील पथक गाझीयाबाद राज्य उत्तर प्रदेश येथे जावून सदर गुन्हयाचे अनुशंगाने तपास करत आहेत.

सदरची कामगीरी उपायुक्त परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग राहुल आवारे सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, महेश मंडलिक, किरण कांबळे, चंद्रकांत जाधव, बजरंग पवार, अमित पदमाळे, सागर सुतकर, अभिजीत वालगुडे, महेश भगत खंबु शिंदे, योगेश चोले यांनी केली आहे.