मानवत येथील संत गुरु रविदास महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर…


(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) –
दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी मानवत येथे संत गुरु रविदास महाराज जयंती साजरी केली जाणार असून या संद र्भात २६ जानेवारी रोजी महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान बैठकीत गुरु रविदास महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांच्या मार्गदर्शना खाली गठीत करण्यात आली यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील तर मुख्य मार्गदर्शक म्हणून नारायण पानझाडे हे होते. यावेळी समाज बांधवांच्या उपस्थितीत गुरु रविदास महाराज यांच्या ६४८ व्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीची निवड करण्यात आली. यात सार्वजनिक जयंती उत्सव समितीचा अध्यक्षपदी ओंकार माणिक वाघमारे, तर उपा ध्यक्षपदी शिवाजी ठोंबरे, सचिवपदी राजेंद्र कांबळे, सहसचिवपदी शिवाजी भगवान शिंदे, कोषाध्यक्षपदी ज्ञानेश्वर उत्तम पानझाडे, कार्याध्यक्षपदी परमेश्वर वाघमारे, सल्लागार म्हणून मा. नगराध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील मुरलीधर ठोंबरे, नारायण पानझाडे, हनुमान नांदुरे, मदनराव कांबळे, सुदामराव कांबळे यांच्या तर सदस्य म्हूणन भागवत कांबळे, रमेश केंदळे, शिव प्रसाद कावळे, गणेश कांबळे, रामेश्वर पानझाडे, कृष्णा सावरे, घन श्याम कुरील, कमलाकर फुलपगार, यांची निवड करण्यात आली. २३ फेब्रुवारी रोजी मानवत शहरात गुरु रविदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा यांची संयुक्त जयंती साजरी करण्याचे निश्चित झाले असून सकाळी ९ ते १२ दरम्यान शहरातील मध्यवर्ती बँक ते महाराणा प्रताप चौक गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे या नंतर निमंत्रित मान्यवरांचा सत्कार सोहळा होणार असल्याचे निश्चित झाले यावेळी बैठकीस अर्जुन ठोंबरे, संतोष कांबळे, ज्ञानोबा नेटक, रामेश्वर पानझाडे, विलास पानझाडे, गणेश पानझाडे, गणेश कांबळे, मारोती पवार, हरी ठोंबरे, शिवा पानझाडे, तुकाराम पानझाडे, दिनेश आधाटे, बालाजी पानझाडे, अशोक कांबळे, रमेश ठोंबरे, यांच्या सह चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.