४ फेब्रुवारी रोजी विनामूल्य अग्निकर्म आणि विद्धकर्म चिकित्सा शिबीर


पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) कै.वैद्य रामचंद्र बल्लाळ गोगटे यांच्या जयंतीनिमित्त ‘इंडियन ड्रग्स रिसर्च असोसिएशन अँड लॅबोरेटरी’च्या इंटिग्रेटीव्ह पेन मॅनेजमेंट क्लीनिक कडून व गोगटे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दि.४ फेब्रुवारी २०२५ रोजी मोफत अग्निकर्म आणि विद्धकर्म चिकित्सा शिबिर सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.शरीरातील विविध प्रकारच्या वेदना,सांधेदुखी, गुडघेदुखी,मणक्याचे विकार,टाचदुखी,पायाला झालेले कुरुप,मनोकायिक विकार अशा रुग्णांसाठी हे उपचार उपयुक्त आहेत.मोफत रुग्ण तपासणी व उपचार करण्यात येणार आहे.फाऊंडेशनच्या वतीने डॉ.प्रज्ञा अक्कलकोटकर,डॉ.पूर्वा गोखले यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली . हे शिबीर महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे प्रादेशिक केंद्र,डॉ.घारपुरे बंगला,हर्डीकर हॉस्पिटल जवळ (शिवाजीनगर) येथे सकाळी या वेळेत होईल.अधिक माहितीसाठी,विनामूल्य नोंदणीसाठी ९८२२०२५४६३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.