शहरातील अवैध धंदे व प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत- पोलीस आयुक्त अमितेशकुमार


प्रतिनिधी (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पोलीस आयुक्तांच्या कडक इशाऱ्यानंतरही शहरात मात्र, अवैध प्रकार सुरू आहेत. काही ठिकाणी ‘चोरून’ सुरू आहेत, असे म्हणत आमचा काही संबंध नाही, हे दाखवित असल्याचे दिसत आहे. पण, हद्दीत अवैध धंदा त्यांच्या संमतीशिवाय सुरूच होत नाही, हे सांगायला भ्रह्म देव लागत नाही. कारण, अवैध धंदा चालवायला कोणाला द्यायचा, त्यापुर्वी कोण करत होते, नवा गडी नको असे अनेक अडथळे पार करून अवैध धंदा सुरू होतो. पण, सध्या पुण्यात पोलीस अवैध धंदे चोरून सुरू आहेत, आम्हाला काही माहिती नाही, अशी भूमिका घेत आहेत.दरम्यान, पोलीस आयुक्तांना एका नागरिकाने थेट मॅसेज करून बंटी मिश्रा (वय ३६) याच्या अवैध धंद्याबाबत तक्रार दिली. ही माहिती मिळाल्यानंतर आयुक्तांनी संबंधित पोलीस ठाण्याला कारवाईचे आदेश दिले. पण, स्थानिक पोलिसांनी हद्दीचा मुद्दा पुढे करत आयुक्तांना ‘आम्ही त्यात’ले नाही असे सांगण्याचा प्रयत्न सुरू केला. येरवडा पोलीस व विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या बॉर्डरवर हा धंदा चालविला जात होता. आयुक्तांनी लागलीच दुसऱ्या पोलीस ठाण्यालाही याची माहिती दिली. त्यांनीही हद्दीचा मुद्दा पुढे आणला. मग, मात्र आयुक्तांचा पार चढला आणि आयुक्तांनी आता येरवडा अन् विश्रांतवाडी पोलिसांनीच या अवैध धंद्यावर छापा कारवाई करून बंटी मिश्राला धडा शिकवा असे आदेश दिले. इतकेच नाही तर दोन्ही पोलीस ठाण्यांनी एकत्रित कारवाई करण्यास सांगितले.पोलीस आयुक्तांकडून अवैध प्रकार अन् अवैध धंद्याना तीव्र विरोध असताना देखील स्थानिक पोलीस छुपा आश्रय देत अवैध धंदे चालविताना दिसत असून, येरवडा आणि विश्रांतवाडी पोलिसांनी एका ‘अवैध धंद्या’वरून हद्दीचा मुद्दा काढत तो तर आमच्या हद्दीत नाही, असा लंपडाव थेट पोलीस आयुक्तांसमोर खेळला गेला. पण, कडक शिस्तीचे अन् चाणक्य असलेले पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मनी-ध्यानी नसलेला जालीम उपाय काढत विश्रांतवाडी अन् येरवडा पोलिसांनाच एकत्रित कारवाई करून तो अड्डा उद्धवस्थ करण्याचे आदेश दिले. मग, मात्र दोघांनीही त्या अड्यावर धाड टाकत कारवाई केली. फक्त कारवाई न करता त्याला पार चड्डीवर ‘मांडी’ घालून बसवला गेला. त्याला प्रसाद देत अड्याचा पुर्ण सेटअप मोडला. पोलीस आयुक्तांच्या या वेगळ्या रूपाने मात्र सर्वच पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना अन् कामकाज पाहणाऱ्यांना घाम फुटला आहे, हे खरे शहरातील अवैध धंदे व प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा थेट इशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार सातत्याने देतात. अधिकाऱ्यांना बैठकीत यावरून फैलावर देखील घेतले जाते. तर, धंदा आढळला, तर बदलीला तयार रहा असेही ठणकावून सांगत आयुक्त अशा प्रकारांना पाठबळ देणाऱ्यांना धारेवर धरत असतात. काही अधिकाऱ्यांना अवैध प्रकार, कामात चुकराई केल्याने पदभार काढून घेत नियत्रंण कक्षात देखील पाठविले आहे. पोलीस आयुक्तांच्या या दणक्यानंतर धावपळ करत विश्रांतवाडी व येरवडा पोलिसांनी एकत्रित कारवाई केली आणि बंटी मिश्रा याला पकडले. अड्यावर छापा टाकत तेथील खेळींनाही पकडले. या घटनेची पोलीस दलात खमंग चर्चा तर सुरूच आहे. पण स्थानिक पोलिसांनी याचा चांगलाच धसका घेतला आहे.