…या भेटीमधून कोणताही राजकिय अर्थ काढू नये, ”मी काँग्रेस” पक्षात आहे- रविंद्र धंगेकर


पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
पुण्यातील अनेक माजी आमदार महायुतीमध्ये सहभागी होतील,असे विधान केले होते. तर कसबा आमदार रविंद्र धंगेकर यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.
त्यानंतर रविंद्र धंगेकर हे काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमांना आणि बैठकांना कमी हजेरी लावल्याचे पाहण्यास मिळाले.त्यामुळे रविंद्र धंगेकर यांच नेमक चाललय तरी काय हे समजण्यास मार्ग नव्हता. त्याच दरम्यान रविंद्र धंगेकर यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली
. या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झालीयामुळे रविंद्र धंगेकर हे लवकरच शिंदे गटामध्ये प्रवेश करणार,अशी चर्चा सुरू झाली. त्या भेटी बाबत रविंद्र धंगेकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, मी काल मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.ही भेट वैयक्तिक कामासाठी होती.या भेटीमधून कोणताही राजकिय अर्थ काढू नये,मी काँग्रेस पक्षात आहे.
तसेच मी काल एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.तर येत्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीची सत्ता आली.तर महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.त्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक माजी आमदार,नेते महायुतीमधील घटक पक्षात प्रवेश करीत आहे. तर काही दिवसापूर्वी पुण्यातील ठाकरे गटाच्या पाच माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता.त्यावेळी महायुतीमधील नेत्यांनी सांगितले होते की