भक्तिमय वातावरणात विश्वकर्मा जयंती साजरी प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेची रथयात्रेतून मिरवणूक

निगडी (प्रतिनिधी) १० फेब्रु : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)विश्वकर्मीय समाज पिं-चिं शहर सामाजिक संस्था समाजाच्या वतीने
संपूर्ण सृष्टीचे सृजन कर्ता म्हणजेच विश्वाचे पहिले शिल्पकार व वास्तुकार प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेची रथयात्रा मिरवणूक काढून भक्तिमय वातावरणात विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी सुतार, लोहार, सोनार, शिल्पकार, तांबट या विश्वकर्मीय समाजाचे प्रतीक असलेल्या पंचरंगी ध्वज उंचावत मिरवणुक आकुर्डी खंडोबा मंदीर चौक येथे प्रभू विश्वकर्मा यांच्या मूर्तीचे आरती व पूजन श्री खंडोबा मंदिर देवस्थानच्या मैदानात कारण्यात आली.
यावेळी खंडोबा देवस्थान ट्रस्ट आकुर्डी अध्यक्ष विठ्ठल काळभोर व विश्वस्त ज्ञानेश्वर कुटे, तुकाराम बागल तसेच, उत्तम केंदळे नगरसेवक पिं चि महानगरपालिका, संतोष जाधव नगरसेवक पिं चि महानगरपालिका, संजीवन सांगळे, उद्योजक इरप्पा पांचाळ, सत्यभाई त्रिपाठी, मारुती परीट, विलास भालेराव, ग्रंथमित्र रमेशराव सुतार, डॉ कृष्णकांत मानकर, अनिता पांचाळ, संतोष भागवत, भारती मानमोडे व ह.भ.प. सचिन महाराज जाधव,मुख्य समन्वयक विद्यानंद मानकर यांच्या हस्ते झाले.
प्रभू विश्वकर्मा भव्य रथयात्रा व मिरवणूक खंडोबा माळ आकुर्डी वरून निगडी मार्गे विश्वकर्मा मंदिर यमुनानर निगडी येथे मार्गस्थ झाली. या भव्य दिव्य रथयात्रा व मिरवणुकीमध्ये वारकरी संप्रदायांमधील परंपरा जपण्यासाठी विश्वगुरु वारकरी संस्था आळंदी येथील 150 वारकरी विद्यार्थी व विद्यार्थिनी टाळ आणि मृदुंगाच्या नादामध्ये प्रभू विश्वकर्मा यांच्या नामाचा जयघोष करत या मिरवणुकीत सहभागी झाले होते. रथाला आकर्षक विद्युत रोषणाई लहू सुतार यांनी तर सजावट भरत गायकवाड, विठ्ठल गरुड यांनी केली. आलेल्या पुरुष व महिला भाविक व भक्तांचे स्वागत विठ्ठल सुतार यांनी भगवे फेटे बांधून केले.
रथयात्रेदरम्यान सामाजिक प्रबोधन करण्याच्या दृष्टीने आरोग्य, शिक्षण व आर्थिक सक्षमीकरणाच्या प्रबोधन केले. बरोबरच दिनांक १६ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाने निर्माण केलेल्या “संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळाला” त्वरित आवश्यक निधी प्राप्त करून देण्यात यावा. अशी मागणी कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक विद्यानंद मानकर यांनी यावेळी केली. सर्व विश्वकर्मीय माता भगिनी व बांधव यांचे सामाजिक सलोखा व बंधुता अबाधित राहण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील ओतारी, साळी, नाथपंथी भराडी, वीरशैव लिंगायत, नामदेव शिंपी, नाभिक समाज सहभागी झाले होते. अन्य समाजाच्या वतीने देखील रथयात्रेचे भव्य स्वागत करण्यात येऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला.
या मिरवणुकीला आमदार महेश लांडगे यांनी सर्वोपतरी मदत करून सहकार्य केले. पुणे जिल्ह्याच्या परिसरातील म्हणजेच, खेड आंबेगाव जुन्नर मावळ मुळशी लोणावळा या परिसरामधील समाज बांधव माता भगिनी ह्या भव्य रथयात्रा मिरवणुकीला उपस्थित राहिले. भव्य रथयात्रा व मिरवणुकीची सांगता विश्वकर्मा मंदिर सेवाभावी ट्रस्ट यमुनानगर निगडी येथील मंदिरात होऊन सर्व भाविक व भक्त यांनी महाआरती व महाप्रसादाचा लाभ घेतला.
मिरवणूक व रथ यात्रेचे आयोजन विद्यानंद मानकर, भगवान श्राद्धे, बाळासाहेब करडके, विठ्ठल गरुड, दत्तात्रय कदम, अनिता पांचाळ, रेशमा केदारी, ज्ञानेश्वर सुतार, सतिश सुतार, विवेकानंद सुतार, सचिन सुतार, चंद्रकांत गायकवाड, तात्यासाहेब पांचाळ, रामलिंग सुतार, राजेंद्र चौधरी, संजय सुतार, श्रीपाद सुतार, प्रकाश बापरडेकर, गणेश भोपे, विजय मानमोडे, मंगेश कदम, विशाल गाडेकर, आशुतोष सुतार, बबन केदार, भिकाजी आहेर, जालिंदर दिवेकर, संजीव सुतार, प्रकाश सूर्यवंशी, सागर पवार, सोहम मानकर, रवींद्र जाधव, गणेश सूर्यवंशी, सुनील बोरसे यांनी सकल विश्वकर्मीय समाजाच्या वतीने करण्यात आले.
भव्य रथयात्रा व मिरवणुकीचे सूत्रसंचालन किशोर कदम व आभार विद्यानंद मानकर यांनी केले.

Latest News