एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये राज्यभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा


पिंपरी, पुणे (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) (दि. ५ मार्च २०२५) मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी माणसांचा अभिमान द्विगणित झाला आहे. भारतात अनेक भाषा बोलल्या जातात त्या विविधतेत एकता आहे. त्यापैकी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर चा हा पहिला मराठी राज्यभाषा दिन मोठ्या उत्साहात रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये साजरा करण्यात आला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) एस. बी. पाटील पब्लिक स्कूल येथे गुरुवारी मराठी राज्यभाषा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य बिंदु सैनि, उपप्राचार्य पद्मावती बंडा यांच्यासह कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थिनीं व सुलोचना पवार यांनी मराठी भाषा व महाराष्ट्र गौरव समूहगीत सादर केले. कार्तिकी भोंडवेने मराठीचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेवर झालेला इतर भाषेचा परिणाम दाखवणारे मराठी नाटक सादर केले. तसेच महाराष्ट्राचे नैसर्गिक सौंदर्य दाखवणारा व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला. सुनिता पाटील, जयश्री काळे, स्नेहल कोकरे, रूपाली पाटील, रोहिणी कणके, योगिता देशमुख, सुचिता फुलारी या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे नियोजन समन्वयिका वंदना सांगळे, विभाग प्रमुख मंजुषा नाथे यांनी केले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांना मराठी राजभाषा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन राजवर्धन पाटील आणि आग्या नाईक यांनी केले.