आयुर्वेदिक उपचार केंद्रातील महिलांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून खंडणी मागणाऱ्यांना अटक सहकारनगर पोलिसांची कारवाई

पुणे (ऑनलाईन न्यूज परिवर्तनाचा सामना )     तेजश्री आयुर्वेदिक उपचार केंद्र पुण्याईनगर क्लासीक हाईटस , धनवकडी पुणे  दोघेजण आयुर्वेदिक उपचार केंद्रात येवुन त्यांनी आयुर्वेदिक उपधाराची माहिती विचारली असता त्यानंतर थोड्या वेळाने २ ते ३ इसम रोहित वाघमारे याचे सोबत आले व आम्हाला २०,०००/- रुपये दे नाहितर तुझा उपचार करीत असताना न कळत काढलेला व्हिडीओ दाखवुन हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्यांना सहकारनगर पोलिसांनी अटक करून कारवाई केली

त्याबाबत सदर इसमाविरूध्द दिनांक ०६/०३/२०२५ रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं.९४/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०८ (२),३०९ (४),७४,७९,११५(२), ३५२,३५१ (२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे. तु जर मी सांगेल तसे उपचार केले नाहिस तर तुझे आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद करून टाकेन असे सांगुन जबदरस्तीने उपचार करून घेतले.

दाखल गुन्हयाचा तपास सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी सपोनि सागर पाटील व पोलीस अंमलदार असे तपास करीत आहेत

तांत्रीक विष्लेशन करुन, संशयीत आरोपींचे डाव ठिकाण्याबाबत माहिती प्राप्त करुन, १) रोहीत गुरुदत्त वाघमारे वय २९ वर्षे मुळ रा. यशोदीप चौक चौधरी बिल्डींग वारजे माळवाडी पुणे २) शुभग चांगदेव धनवटे वय २० वर्ष रा उत्तम नगर ३) राहुल ज्ञानेश्वर बाघमारे वय ३६ वर्ष रा पौड रोड कोथरुड पुणे

त्यांचेकडे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्यांना दाखल गुन्हा केल्याची कबुली देवुन सदरचा प्रकार पुणे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी केला असल्याचे उघड झाले आहे

आरोपीना मा. न्यायालयान 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.अटक आरोपीतांकडे अधिक तपास करीता यातील आरोपी क्रमांक १) रोहित वाघमारे याचे विरुध्द वारजे पोलीस ठाणे गुरजि.नं. ५०७/२०२१ भांदवी ३५४ अन्वये गुन्हा दाखल आहे.

तसेब आरोपी रोहित वाघमारे व आरोपी शुमम चांगदेव धनवटे याचे विरुध्द अंभोरा पोलीस स्टेशन बीड गु.रजि.नं. २०८/२०२४ भा.न्या. संहिता ३०४ (४) अन्वये दाखल आहे. तसेच पाथर्डी पो.स्टे. जि. अहमदनगर गु. रजि.नं. ८५०/२०२४ भा.न्या.सं. ३०९ (६) अन्वये दाखल असून सदर गुन्हयात पाहिजे आरोपी असल्याची माहिती मिळाली आहे

सो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग राहुल आवारे सोो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गीड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, बजरंग पवार, महेश मंडलिक, सागर सुतकर, किरण कांबळे, चंद्रकांत जाधव, निखील राजीवडे, प्रदिप रेणुसे, आकाश कितीकर, महेश भगत, अमित पदमाळे, योगेश ढोले, खंडू शिदे यांनी केली आहे

Latest News