भविष्याचा विचार करून मुळशी धरणाचे पाणी पिंपरी चिंचवड शहरास मिळावे – संदीप वाघेरे


पिंपरी प्रतिनिधी – (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) – मुळशी धरणातून पुणे शहर व मुळशी तालुक्यातील गावासाठी पाणी मिळावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. या पाश्वभूमीवर या धरणातील पाणी घेण्यातील अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत चर्चा करून कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत २०२५ अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बैठक होणार असल्याने भविष्याचा विचार करून मुळशी धरणाचे पाणी पुणे शहरासह पिंपरी चिंचवड शहरास देखील मिळावे अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांचेकडे ई मेल द्वारे केली आहे. याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि,पिंपरी चिंचवड शहराचे क्षेत्र १८१ चौ.कि.मी. आहे . सन २०११ चे जणगणनेनुसार शहराची लोकसंख्या सुमारे १७ लक्ष एवढी असून सध्याची लोकसंख्या अंदाजे ३२ ते ३४ लाखापेक्षा जास्त आहे. पिंपरी चिंचवड हे झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरामध्ये देशात तृतीय तर राज्यात प्रथम स्थानावरील शहर आहे. पिंपरी चिंचवड शहराला दैनंदिन पाणीपुरवठा करणेसाठी पवना धरणातून ६.५५ टी.एम.सी.भामा आसखेड धरणातून २.१५ टी.एम.सी.व आंद्रा धरणातून १.२९ टी.एम.सी. असे एकूण १० TMC एवढे आरक्षण मंजूर आहे. उद्योगनगरी असल्याने शहरात उद्योगासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची मागणी दिवसंदिवस वाढत आहे.
सद्यस्थितीत पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून जलविद्युत प्रकल्पातून पवना नदीत सोडणेत आलेले पाणी रावेत येथील पवना नदीवरील बंधा-यातून दैनंदिन ५३५ ते ५४० द.ल.लि. प्रतिदिन इतके पाणी पंपाद्वारे घेतले जाते व सदर पाण्याचे शुध्दीकरण निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात करणेत येते.
शहराची लोकसंख्या विचारात घेता, तसेच वितरण व्यवस्थेतील गळतीचा विचार करता प्रतिदिन प्रतिमाणसी होणारा सरासरी पाणीपुरवठा १३५ लि. प्रतिदिन प्रतिमाणसी पेक्षा कमी आहे. शहराच्या भौगोलिक रचनेचा विचार करता सद्यस्थितीत १ वेळ १ दिवसाआड परंतु २ दिवस पुरेल इतका पाणीपुरवठा करणेत येत आहे.तसेच पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा विषयक संक्षिप्त माहिती खालील प्रमाणे आहे.

  • अशुध्द पाणी उत्सर्जन यंत्रणा २३ पंप ५४० द.ल.लि. पाणी उपसण्याकरीता
  • जलशुदीकरण केंद्र @ से. २३ निगडी – ५२८ द.ल.लि.

टप्पा-१ – १९८९ -११४ द.ल.लि.
टप्पा-२ – १९९९ – ११४ द.ल.लि.
टप्पा-३ – २००६ -१०० द.ल.लि.
टप्पा-४ – २०१० -१०० द.ल.लि.
क्षमता वाढ- २०२३ -१०० द.ल.लि.

  • संचयन क्षमता-जलशुध्दीकरण केंद्र ४० द.ल.लि. (phase 1,2,3& ४, CCT)
  • नवीन जलशुदीकरण केंद्र @ चिखली
    टप्पा-१ २०२३ पूर्ण
    टप्पा- २ प्रस्तावित
    -१०० द.ल.लि. (आंद्रा स्त्रोत)
    -१६७ द.ल.लि. (भामा स्रोत)
    संचयन क्षमता-जलशुध्दीकरण केंद्र १२.५ द.ल.लि. याव्यतिरिक्त सन २०४१ अंदाजित लोकसंख्येचा विचार करिता शहराला होणारी पाण्याची वाढ एकूण १७०९ एम.एल.डी.असणार असून पाण्याचा तुटवडा एकूण ९१४ एम.एल.डी असणार आहे.यावर उपाययोजना करताना पवना पाईप लाईन साठी किमान १००० कोटी अनुदान आवश्यक असणार आहे यामुळे पाणी धरणातूनच थेट पाईपलाईन द्वारे उचलावे अशी अट आहे त्या अटीची पुर्तता होणार आहे. व मनपा ने सुद्धा बंधारे बांधून दिले आहेत .त्यामुळे शेती साठी नदीत पाणी साठून राहणार आहे. सद्यास्थितीत नदीतून पाणी घेताना Evaporation आणि Infiltration द्वारे वाया जाणारे साधारण: १ टीएमसी पाण्याची वार्षिक बचत होऊन वाढत असलेले शहरीकरण व त्यामुळे नदीचे होणारे प्रदूषण मुळे थेट पाईप लाईन द्वारे पाणी घेणे योग्य व आवश्यक आहे. तसेच पाण्यचे शुध्दीकरण करणेसाठी वापरणेत येणा-या केमिकल्सचीबचत होणार आहे. सदर बाब शहरातील ३५ लाख नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत आहे. याव्यतिरिक्त दररोज १०० एमएलडी पाणी जे वाया जाते ते पिण्यासाठी उपलब्ध होईल. २०३१ पर्यंत च्या लोकसंख्या साठी सध्याचे पाणी अपुरे पडणार आहे जे त्यामुळे महापालिकेला पाण्याच्या नवीन स्रोत शोधणे गरजेचे झालेले आहे .जसे मुळशी , चासकमान आदि नजीकचे धरणातून पाणी १५-२० टीएमसी पाणी २०५१ च्या लोकसंखेसाठी लागणार आहे. पुणे हद्दीतील सदर धरणातील पाणी पिंपरी चिंचवड शहरासाठी साठी मिळणे बाबत शासन स्तरावर निर्णय घेणे उचित आहे. कारण या शहराचा ल…

Latest News