पी. एन. भगवती आंतरराष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धेचे उद्घाटन-भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज कडून आयोजन


परिवर्तनाचा सामना
पुणे:भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज(एरंडवणे,पुणे) यांच्या वतीने आयोजित तेराव्या न्यायमूर्ती पी. एन. भगवती आंतरराष्ट्रीय मानवाधिकार मूट कोर्ट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले
उद्घाटन प्रमुख पाहुणे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा आणि नेपाळ सर्वोच्च न्यायालयाचे न्या. टेक प्रसाद दुंगाना यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी कुलगुरू प्रा. डॉ. विवेक सावजी आणि कुलसचिव जी.जयकुमार यांनी उपस्थित राहून मानवाधिकार अधिवक्त्यांच्या संवर्धनासाठी या उपक्रमाची आवश्यकता स्पष्ट केली.
स्पर्धा पुढील दोन दिवस चालणार असून अधिष्ठाता आणि प्राचार्या डॉ. उज्वला बेंडाळे, उपप्राचार्या डॉ. ज्योती धर्म, समन्वयक डॉ. विद्या ढेरे आणि प्राध्यापक समन्वयक डॉ. शिवांगी सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विधी महाविद्यालयांचे ३२ संघ सहभागी झाले आहेत.स्पर्धेच्या पहिल्या दिवसअखेर आठ संघांनी उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्रता मिळवली . न्यायमूर्ती पी.एन.भगवती आंतरराष्ट्रीय मानवाधिकार मूट कोर्ट स्पर्धा माजी भारताचे सरन्यायाधीश (स्व.) पी.एन.भगवती यांच्या दूरदृष्टीला वाहिलेली एक श्रद्धांजली आहे. २०११ मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेने जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवली आहे
आणि विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याच्या गुंतागुंतीचा अभ्यास करण्याची तसेच त्यांचे न्यायालयीन कौशल्य विकसित करण्याची संधी प्रदान केली आहे. यंदाच्या स्पर्धेचा विषय मानवाधिकार आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या संगमावर केंद्रित असून, संस्थापक कुलगुरू डॉ. पतंगराव कदम यांच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे……..