अधिवेशनात शहराचा स्वतंत्र ठसा उमटवण्यात काही अंशी यश – आमदार अमित गोरखे


युवा आमदार अमित गोरखे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले शहरातील विविध प्रश्न
पिंपरी, पुणे (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) नुकत्याच संपन्न झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेमध्ये सदस्य म्हणून पिंपरी चिंचवड शहरासह राज्यातील विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मी विविध प्रश्न उपस्थित केले. परभणी येथे चिमुकलीवर झालेले अत्याचाराला वाचा फोडून आरोपीवर पोस्को कायद्या अंतर्गत कारवाई करावी राज्य परिवहन महामंडळ बसचे विद्युतीकरण करावे अशा राज्यस्तरीय मुद्द्यांबरोबरच पिंपरी चिंचवड शहरातील स्थानिक प्रश्न देखील या अधिवेशनात मांडण्याची संधी मला मिळाली. यामध्ये पवना नदी प्रदूषण तसेच रिव्हर फ्रंट काँक्रिटीकरण, पिंपरी चिंचवड महापालिकेतील अंतर्गत रस्त्याची झालेली दुर्दशा व निकृष्ट दर्जा, पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आयटी विभागात झालेला मोठ्या प्रमाणातील गैरव्यवहार, एमआयडीसी संभाजीनगर व शाहूनगर भागात युडीपीसीआर धोरण लागू करण्यासंदर्भात लक्षवेधी लावून तातडीने उद्योग राज्यमंत्री महोदयासोबत बैठक लावून धोरणात्मक निर्णय घेण्यास उद्युक्त केले. तसेच संविधानावरील अतिशय वैचारिक यथार्थ भाषण, मागासवर्गीय आरक्षण उपवर्गीकरण असे प्रभावी मुद्दे मांडून अधिवेशनात पिंपरी चिंचवड शहराचा स्वतंत्र ठसा उमटवण्यात काही अंशी मी यशस्वी झालो असे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले.
आमदार अमित गोरखे यांनी शुक्रवारी (दि.२८) चिंचवड येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते सदाशिव खाडे, भाजपा महिला शहराध्यक्ष सुजाता पालांडे, शहर सरचिटणीस राजू दुर्गे, विजय उर्फ शितल शिंदे, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, ज्येष्ठ नेते राजेंद्र बाबर, भाजपा शहर कार्यकारणी सदस्य नेताजी शिंदे, युवा कार्यकर्ते बाळा शिंदे, गणेश लंगोटे आदी उपस्थित होते.
आ. अमित गोरखे यांनी भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त”संविधान गौरव” चर्चेदरम्यान विधान परिषदेमध्ये काही मुद्दे मांडले.आपल्या संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाली!२६ जानेवारी १९५० रोजी लागू झालेले हे संविधान समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यांचे प्रतीक आहे. उद्देशपत्रिका ही संविधानाची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक नागरिकाचा हक्क अबाधित राहावा यासाठी संविधान हे भक्कमपणे नागरिकाच्या हक्कांचे रक्षण करते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दूरदर्शी विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात. संविधानामुळेच देशात लोकशाही टिकली आहे आणि संधींची दारे सर्वांसाठी खुली झाली आहेत. पर्यावरण विषयक चर्चेत भाग घेताना नदी वाचवा, निसर्ग जगवा ! पिंपरी-चिंचवड, पवना आणि मुळा नदी किनारी सिमेंटच्या अवाढव्य बांधकामाला स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी विरोध करत आहेत. नैसर्गिक जैवविविधता नष्ट होत असून झाडांची कत्तल सुरू आहे, त्यामुळे प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी आहे. “कॅन्सर ट्रीटमेंट करा, पण ब्युटी ट्रीटमेंट नको!” असा संदेश देत नागरिकांनी RTF विरोधात आवाज उठवला. “River Pollution से डर नही लगता, Riverfront Development से डर लगता है!” हा जनआवाज बनत विधान मंडळामध्ये फलकाद्वारे लक्ष वेधून नद्यांचा निसर्गरम्य विकास व्हावा, अशी मागणी आ. अमित गोरखे यांनी केली.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पिंपरी चिंचवड शहरातील छत्रपती संभाजी नगर शाहू नगर औद्योगिक विभागातील रहिवासी विभागाला महापालिकेच्या धर्तीवरती यु डी पी सी आर लागू करा अशी लक्षवेधीद्वारे सभागृहात मागणी केली.
“राज्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना गोर-गरीब लोकांना नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून देत असताना औद्योगिक क्षेत्राच्या कामगारांना टाटा मोटर्स, बजाज ऑटो, थरमॅक्स, किर्लोस्कर अशा महाराष्ट्रातील अनेक नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी करत असताना कामगारांना लांबून प्रवास करावा लागत होता अशा वेळेस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिक क्षेत्रात रहिवाशी भूखंड विकसित करून त्यांच्या घरांच्या समस्या सोडवल्या परंतु कामगारांनी कर्ज काढून, शेती विकून, घरच्या महिलांचे दागिने विकून व दागिने गहाण ठेऊन गृहनिर्माण सोसायटीमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील संभाजी नगर, शाहू नगर या परिसरात घरे घेतली आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्या या बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेऊ शकल्या नाहीत, अनेक वर्ष सदरचा दाखला न घेतल्यामुळे त्याचा दंड वाढत गेला असून त्यांची परिस्थिती बिकट झ…