एप्रिल रोजी उलगडणार ‘तात्यांच्या प्राणीकथा’ !—भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्यासांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन


५ एप्रिल रोजी उलगडणार ‘तात्यांच्या प्राणीकथा’ !——————————–कै.व्यंकटेश माडगूळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम———–भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्यासांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन
पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘तात्यांच्या प्राणीकथा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी कथेचे शिल्पकार,वन्यजीवन अभ्यासक,चित्रकार कै.व्यंकटेश माडगूळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्राणीकथांचा मागोवा घेणारा हा दृकश्राव्य कार्यक्रम आहे
.शनिवार ,दि.५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे.’व्यंकटेश माडगूळकर अभिधान’ तर्फे हा कार्यक्रम प्रस्तुत केला जाणार आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. निर्मिती,संकल्पना आणि निवेदन ज्ञानदा नाईक यांचे आहे.दिग्दर्शन मोहन माडगूळकर यांचे आहे.
निर्मिती सहाय्य राज सांडभोर, आर्या नाईक-दालमिया,नवमी नाईक यांचे आहे.सचिन भुसारी,राधिका माडगूळकर,विभा ओक,स्वानंद पटवर्धन,मोहन माडगूळकर आणि शैला मुकुंद हे कथावाचन करणार आहेत.अभिजित इनामदार यांचे पार्श्वसंगीत,प्रसाद कुलकर्णी यांचे प्रोजेक्शन ,मालविका माडगूळकर यांचे ध्वनी संयोजन आणि प्रकाश योजना निकेतन नंदुरबारे यांची आहे.
भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २३९ वा कार्यक्रम आहे .