महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयात १०,००० रुग्णांचा मोफत डायलिसीस उपचारांचा टप्पा पूर्ण.

महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयात १०,००० रुग्णांचा मोफत डायलिसीस उपचारांचा टप्पा पूर्ण.

पिंपरी, : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयातऑक्टोबर २०२२ मध्ये डायलिसिस विभाग सुरू करण्यात आला आहे. दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी सदर विभागात एकूण १०००० रुग्णांचे डायलिसीस यशस्वीरीत्या पूर्ण झाले.

ही उपचारसेवा महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत (MJPJAY) पूर्णपणे विनामूल्य राबविण्यात येत आहे. यामुळे गंभीर किडनी आजाराने ग्रस्त अनेक रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या नवीन थेरगाव रुग्णालयात ९ डायलिसिस यंत्रे कार्यरत आहेत. तसेच नजीकच्या भविष्यात ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरियल रुग्णालय, आकुर्डी, तालेरा रुग्णालय, जिजामाता रुग्णालय आणि नवीन भोसरी रुग्णालय येथे डायलिसिस विभाग सुरु करण्यात येणार आहे.

नवीन थेरगाव रुग्णालयाचे रुग्णालय प्रमुख डॉ. राजेंद्र फिरके यांच्या मार्गदर्शनाखाली डायलिसिस विभागाचे प्रमुख म्हणून डॉ. लक्ष्मीकांत अत्रे हे कामकाज पाहत आहेत.”

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या आरोग्यासाठी सातत्याने विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. डायलिसिस सेवा ही त्यातील एक महत्त्वाची आणि जीवनदायी सुविधा आहे. मोफत उपचारामुळे अनेक गरजू रुग्णांना दिलासा मिळत असून, भविष्यात या सेवेचा विस्तार ही आमची प्राथमिकता असेल.”- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका