शुक्रवारी विशाल नगर, पिंपळे निलख येथील नागरिकांचा हंडा मोर्चा

sac
google photos

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे सचिन साठे यांचे आवाहन पिंपरी, पुणे (दि. ७ एप्रिल २०२५) मागील दोन महिन्यापासून पिंपळे निलख, विशाल नगर, वाकड भागात कमी दाबाने व अवेळी पाणीपुरवठा होत आहे. या परिसरात जवळपास ४० हजार लोकवस्ती, हजारो दुकाने व व्यवसायिक आस्थापना आहेत. मोठ्या प्रमाणात सोसायटी परिसर आहे. मागील सहा वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिवसाआड पाणीपुरवठा देण्याचे धोरण शहरभर सुरू केले होते. तेव्हापासून या परिसरात अनेकदा पाणीपुरवठा कमी दाबाने व अवेळी करण्यात येतो. या परिसरातील नागरिक नियमितपणे महानगरपालिकेचा मिळकत कर व पाणीपट्टी कर भरतात. येथील पाणीपुरवठ्याबाबत अधिकारी व कर्मचारी उदासीन आहेत. मागील दोन महिन्यांपासून या परिसरातील सोसायटी धारकांनी लाखो रुपये खर्च करून टॅंकरने पाणी घेतले आहे. या प्रदूषित पाण्यामुळे येथे रोगराई वाढण्याची शक्यता आहे पुढील चार दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा “ड”प्रभाग क्षेत्रिय कार्यालयावर शुक्रवारी (दि. ११) शेकडो महिला भगिनींचा हंडा मोर्चा काढून प्रभागातील अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल असा इशारा भाजपाचे ज्येष्ठ नेते सचिन साठे यांनी दिला आहे.

Latest News