ॲडव्हान्सड इन्स्ट्रुमेंटेशन टेक्निक’ विषयावर कार्यशाळा….


‘भारती विद्यापीठ पूना कॉलेज ऑफ फार्मसी’ मध्ये आयोजन
पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)- भारती विद्यापीठ च्या पूना कॉलेज ऑफ फार्मसी’ (एरंडवणे) तर्फे आयोजित ‘हँड्स ऑन ट्रेनिंग ऑन ॲडव्हान्सड इन्स्ट्रुमेंटेशन टेक्निक’ (प्रगत उपकरण हाताळण्याचे कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा )ला चांगला प्रतिसाद मिळाला.कार्यशाळेचे उद्घाटन समारंभ डॉ.आरिफ शेख आणि डॉ.नीता श्रीवास्तव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.पूना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.आत्माराम पवार,उपप्राचार्य डॉ. वर्षा पोखरकर,उपप्राचार्य डॉ.सत्यनारायण,संघटन सचिव डॉ.शकुंतला हे उपस्थित होते. प्रगत उपकरण हाताळण्याचे कौशल्य विकसित करणे या प्रमुख हेतूने प्राध्यापक, पदव्युत्तर विद्यार्थी, पीएच.डी.संशोधक यांच्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.सिद्धांतिक ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभूती,अनुभव यातील दरी भरून काढणे तसेच अचूकता,सुस्पष्टता,सुरक्षितता आणि सहकार्य यांना चालना देणे, हा या कार्यशाळेचा मुख्य हेतू होता.संशोधन क्षेत्रात अधिकाधिक कार्य करण्यासाठी तसेच इंटरनशिप सहकार्यासाठी पूना कॉलेज ऑफ फार्मसी आणि इनफिनिया लाइफ सायन्सेस, पुणे यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला . कार्यशाळा उद्घाटनप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना दोन्ही मान्यवरांनी वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात व्यावहारिक, प्रात्यक्षिक ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यशाळेस सहभागी सर्व विद्यार्थी,संशोधक यांना आपली तांत्रिक कौशल्य विकासनाच्या दृष्टीने या कार्यशाळेत सक्रिय सहभागी नोंदवून या संधीचा पुरेपूर लाभ घेणेबाबत प्रोत्साहित केले.