व्यसनाला नका देऊ समाजमान्यता आणि ग्लॅमर – मुक्ता पुणतांबेकर


पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)- ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन’ च्या वतीने ‘व्यसन-आसक्ती ते मुक्ती’ विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.हा परिसंवाद गुरुवार,दि.१० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता गांधी भवन (कोथरूड) च्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात झाला.या परिसंवादाला चांगला प्रतिसाद मिळाला.या परिसंवादात मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर ,प्रफुल्ला मोहिते,विजय बोठे-पाटील हे कार्यकर्ते सहभागी झाले.त्यांच्याशी संगीता जोशी यांनी संवाद साधला.याच कार्य्रक्रमात मुक्ता पुणतांबेकर यांना गौरी शिकारपूर यांच्या हस्ते ‘सर्व्हिस एक्सलन्स रोटरी अवॉर्ड’ देण्यात आला.’रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन’च्या अध्यक्षा डॉ.मीनल धोत्रे,सचिव शशांक टिळक,डॉ.उज्ज्वला बर्वे,डॉ.ऋचा मोकाशी,संगीता जोशी ,गणेश जाधव,डॉ. यशोदा वाकणकर,प्राजक्ता वढावकर,अमीर देसाई, निहार हसबनीस, ओमकार कुंभार हे मुक्तांगणचे कार्यकर्ते उपस्थित होते. परिसंवादानंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला.प्रसाद पंडीत यांनी सूत्रसंचालन केले.अश्विनी शिलेदार यांनी आभार मानले.मुक्ता पुणतांबेकर म्हणाल्या, ‘सवयीचा अतिरेक होणे म्हणजे आपण त्याला व्यसन म्हणतो. व्यसन हा काळानंतर कुटुंबाचा आजार होतो. त्यांच्यासाठी पाहिला उपचार म्हणजे त्यांना व्यसनांपासून दूर ठेवणे.ते मुद्दाम करत नसतात.ते टोकाचं आकर्षण आहे. व्यसन सोडावे हे त्या व्यक्तीला स्वतःला जाणवणे गरजेचं असते. व्यसनाला वय,जात,स्त्री-पुरुष ,आर्थिक परिस्थिती असं काही बंधन नाही. व्यसन लागायचा वयोगट कमी व्हायला लागला आहे. रिमांड होम मधील मुलं,स्त्रिया पण त्यात येतात.व्यसनाला समाज मान्यता मिळत आहे. ग्लॅमर,फॅशन झाली आहे.तसे होऊ नये.’ प्रफुल्ला मोहिते यांनी कुटुंबासाठी आणि महिलांसाठी सुरु केलेला ‘
सहचारी ग्रुप’ बद्दल माहिती दिली. १९९७ पासून हा गट सुरु आहे.यामध्ये व्यसनाधीन असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला मार्गदर्शन दिलं जात, महिला आणि मुलं यांच्यावर जो परिणाम होतो तो कसा कमी करायचा या विषयी मार्गदर्शन केलं जाते. महिलांना मानसिकरित्या त्यांना समर्थ बनविण्याचा प्रयत्न केला जातो.गेली १० वर्ष व्यसनातून मुक्त होऊन आता मुक्तांगण मध्ये कार्यकर्ते म्हणून काम करणारे विजय बोठे -पाटील यांनी त्यांचा जीवन प्रवास उलगडला.दारूचे भयंकर व्यसन ते व्यसनमुक्ती कशी झाली हे त्यांनी सांगितले.मुक्ता पुणतांबेकर म्हणाल्या, ‘मुक्तांगण मध्ये ३० दिवसाचा व्यसनमुक्तीचा कोर्स असतो. यामध्ये सकाळी ६ पासून वेळा पत्रक असते.योगासने, नाश्ता, ग्रुप थेरपी, वैयक्तिक समुपदेशन , कुटुंब समुपदेशन,भावनिक बुद्धिमत्ता,स्ट्रेस मॅनेजमेंट,म्युझिक थेरपी असे वेगवेगळे उपचार केले जातात.७० टक्के बरे होतात, ३० टक्के होत नाहीत ,पण नियमित तपासणी करणे हे गरजेचे आहे.आजकाल दारु, सिगारेट बरोबरच गांजाचे व्यसन जास्त वाढत आहे.याशिवाय मोबाईल, सोशल मिडीया,गॅम्बलिंग हे पण खूप प्रमाण वाढत चाललं आहे.म्हणजेच वर्तनात्मक व्यसन वाढत आहे.व्यसनाधीन व्यक्तीला समजून घेणे,त्याला टोमणे न मारणं,विड्रॉल सिम्पटन मध्ये काळजी घेणं गरजेचं आहे.व्यसनमुकती नंतर त्यांना कुटुंबानी स्विकारलं पाहिजे, त्यांना आम्ही मदत करतो, पुर्नवसन करतो, शिक्षण ,नोकरी, स्किल बेस ट्रेनिग देतो’.