अपहरणाच्या गुन्ह्यात सुमारे दोन वर्षापासुन फरार असलेला गुन्हेगार जेरबंद, सहकारनगर पोलिसांची कामगिरी

अपहरणाच्या गुन्ह्यात सुमारे दोन वर्षापासुन फरार असलेला गुन्हेगार जेरबंद, सहकारनगर पोलिसांची कामगिरी

25फेब्रुवारी 23 ला रोजी साई जिम धनकवडी पुणे येथे अल्पवयीन पिडीत मुलीस लग्नाचे आमिष दाखवुन अपहरण केल्या बाबत विकास शांताराम पवार वय २४ वर्ष रा मु.पो. अंत्रोली ता वेल्हे जि. पुणे यांचेविरुध्द सहकारनगर पोलीस ठाणे गुन्हा दाखल आहे

कलम ३७६.३६६.३६६ अ. पोक्सो ४,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यात आरोपी विकास पवार हा गुन्हा दाखल झाले पासुन सुमारे दोन वर्षापासुन फरार होता त्यास पुणे पोलीस आयुक्तालयाने आरोपी म्हणून घोषित केले होते,

सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे सहकारनगर पोलीस ठाणे येथे हजर असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व प्रदिप रेणुसे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली

की सदर गुन्हयांत २ वर्षापासुन फरार असलेला आरोपी नामे विकास शांताराम पगार हा त्याच्या गावी अंत्रोली येथे घरी आला आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गौड यांना कळविली असता त्यांनी लागलीच सपोनि सागर पाटील व पोलीस अंगलदार यांची टीम तयार करुन त्यांना रायना व गार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले

त्यानुसार सहकारनगर तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन खात्री करून नमुद आरोपीस ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव विकास शांताराम पवार वय २४ वर्ष रा मु. पो. अंत्रोली ता वेल्हे जि. पुणे असे असल्याचे सांगितले.

त्याचेकडे सहकारनगर पोलीस स्टेशनकडील वरील दाखल गुन्हयाचे अनुषंगाने त्यांस विश्वासात घेवुन तपास करता त्याने दाखल गुन्हा केला असल्याचे कबुल केल्याने अटक करण्यात आले आहे.

सदरची कामगीरी , वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहकारनगर पोलीस स्टेशनचे श्री. राहुल गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती सुरेखा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, प्रदिप रेणुसे, महेश मंडलिक, किरण कांबळे, बजरंग पवार, सागर सुतकर, अमित पदमाळे, योगेश ढोले, महेश भगत, खंड शिंदे, आकाश किर्तीकर, मानसिंग जाधव यांनी केली आहे.

Latest News