पुणे जिल्ह्यात चार हजार महिलांना रिक्षा वाटपाचे उद्दिष्ट: अजित पवार


पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
महिला व बालविकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात 4,000 महिलांना रिक्षा वाटपाचे उद्दिष्ट आहे. पहिल्या टप्प्यात 1,726 लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली असून, यापैकी 60 महिलांना आज रिक्षांच्या चाव्या देण्यात आल्या. अजित पवार यांनी यावेळी बोलताना या योजनेचे सामाजिक परिवर्तनातील महत्त्व अधोरेखित केले ही योजना महिलांना सक्षम आणि बळकट करण्यासाठी आहे. यातून रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून, महिला समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील
. प्रवासासाठी पिंक रिक्षांचा प्राधान्याने वापर करावा, कारण त्या सुरक्षित आणि विश्वासार्ह आहेत. यावेळी त्यांनी पुरुष प्रवाशांचे फोटो काढण्याचा सल्ला देत, सुरक्षिततेसाठी हा उपाय उपयुक्त ठरेल. काही विकृत मानसिकतेचे लोक असतात, त्यांच्यापासून सावध राहण्यासाठी हे गरजेचे आहे, ” असाही सल्ला अजित पवार यांनी दिला.
यावेळी अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेच्या यशाचाही उल्लेख केला. कार्यक्रमाला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी-चिंचवड आयुक्त शेखर सिंग, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते
. लाडकी बहीण योजनेला विधानसभा निवडणुकीत महिलांनी मोठा पाठिंबा दिला. ही योजना कधीही बंद होणार नाही. कुणी कितीही अफवा पसरवल्या, तरी महिलांच्या सन्मानासाठी ही योजना सुरू राहील,” असे ठामपणे सांगितले.
यावेळी त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील योजनांचेही कौतुक केले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर येथे आज पिंक ई-रिक्षा वाटपाचा भव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पात्र महिलांना 60 पिंक ई-रिक्षांचे वाटप करण्यात आले.