काल जे झालं त्याची संपूर्ण जबाबदारी केंद्राची – खासदार संजय राऊत


मुंबई : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशदवादी हल्ला करण्यात आला. पहलगाम हल्ल्यामध्ये 26 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. . पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पर्यटकांवर निशाणा साधण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या टीआरएफ म्हणजेच ‘द रेझिस्टंट्स फ्रंट’ ने घेतली आहे खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचे सांगितले.
“काल जे झालं त्याची संपूर्ण जबाबदारी केंद्राची आहे. हा जो सीझन आहे तो टुरिस्ट सीझन आहे. जेव्हा अमित शहा श्रीनगरमध्ये उतरले तेव्हा अनेक गाड्या त्यांच्यासोबत होत्या. सामान्य माणसांसाठी कोणतीच सुरक्षा व्यवस्था नव्हती. ही लोक डिफेन्समध्ये कात्री करत होते. टेररिझम वाढत आहे ही लोक संसदेत खोट बोलत आहे.
काल जे झाला त्याला जबाबदार नरेंद्र मोदी आहे. निवडणूक आली की ही लोक मोठी मोठी गोष्ट करतात. नवीन लग्न झालेल्या लोकांची तिथे हत्या करण्यात आली,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
गृहमंत्री अमित शाह हे श्रीनगरमध्ये दाखल झाले. यावरुन देखील खासदार राऊत यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “अमित शाह हे सेल्युअर गृहमंत्री आहे. एक मिनिटं देखील त्यांनी राहिला नाही पाहिजे. हे लोक राजकारणात व्यस्त आहे. अमित शहा जर श्रीनगरमध्ये गेले तर मेहरबानी केली का?
धर्माचे राजकारण चालू आहे ते बुम्रांग होणार. आपले अनेक भाऊ मेले आहेत. ही अमित शहा यांची जबाबदारी नाही का? अमित शहा जी का निषेध करो. आमच्यासारख्या लोकांना कुठे सुरक्षा आहे? काय करणार हे मस्जिद तोडणार का? ही लोक फक्त राजकारण करू शकतात,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. यामुळे विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे“पहलगाम दहशदवादी हल्ल्याबाबत एकनाथ शिंदे काय उत्तर देणार? त्यांच्या लोकांना घेऊन काय सीमेवर जाणार का? देशाच्या इतिहासातले सर्वात अपयशी गृहमंत्रीअमित शहा आहेत.
२४ तास तुम्ही सरकार पाडण्यात अडकतात. तुम्ही राष्ट्राचे संरक्षण कधी करणार? याला जबाबदार प्रधानमंत्री आहे. गृहमंत्री जर राजीनामा देणार असतील तर सर्वपक्ष बैठक ठेवा. तुम्ही लोकांनी त्यांना स्वर्गात पाठवले, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. हे आंदोलन करून कोणाचा निषेध करणार आहे. मंगल प्रभात लोढा कोणाचा निषेध करणार आहे? या दिवसाच्या इतिहासातील सर्वात अपयशी गृहमंत्री असेल तर ते अमित शहा आहेत.