लाडक्या बहिणीचं पुढील 2 ते 3 दिवसांत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा केला जाईल…


(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अद्यापही जमा न झाल्याने राज्यातील लाखो महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. मात्र, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.आदिती तटकरे यांनी ट्विटरवरून माहिती देताना सांगितले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी आजपासून पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा केला जाईलयामुळे महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणाचा सरकारचा संकल्प अधिक दृढ होत आहे, असेही त्यांनी नमूद केले. महिलांनी आपले बँक खाते आधारशी लिंक केले असल्याची खात्री करणे आवश्यक आहे, जेणेकरून निधी योग्य प्रकारे जमा होईल.आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या घोषणेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही योजनेच्या निधीविषयी स्पष्टीकरण दिलंते म्हणाले, “लाडक्या बहिणीचं नियोजन केलं आहे आणि त्यानुसार निधी लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सगळ्या योजनांचे पैसे देण्याचा प्रयत्न केला जातोय.”या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये सन्मान निधी दिला जातो. एप्रिल महिन्याचा हप्ता उशिरा जमा होण्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. मात्र, आता ही प्रक्रिया सुरू झाली असून काही दिवसांत सर्व लाभार्थींना पैसे मिळणार आहेत.