उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना श्रम महर्षी पुरस्कार….


पिंपरी-(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)-मुंबईतील कामगारांनी 11 मे 1888 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांना महात्मा पुरस्कार दिला व त्यानंतर ज्योतिराव फुले हे महात्मा ज्योतिराव फुले म्हणून ओळखले जाऊ लागले. आता 137 वर्षांनंतर 11 मे या दिनांकचे औचित्य साधत दिनांक 9 मे 2025 रोजी कामगार कष्टकरी श्रमिक शेतकरी व उद्योजकांच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री ना. मा. एकनाथरावजी शिंदे यांना श्रम महर्षी पुरस्कार बहाल करत आहे. पुणे सातारा चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेच्या वतीने दिनांक 9 मे 2025 रोजी ग दि माडगूळकर नाट्यगृहात दुपारी २.३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री ना मा शंभुराजे देसाई, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना मा शिवेंद्रराजे भोसले, राज्याचे ग्रामविकास मंत्री ना मा जयकुमार गोरे व राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना मा मकरंद जाधव पाटील तसेच महाराष्ट्र राज्य विधानसभेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात राज्यातील झुंजार कामगार नेते व राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भाऊ भोसले यांना श्रमयोगी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक बापू शिंदे पाटील हे भूषविणार आहेत.