शेतकऱ्यांना CBL मागू नका- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांकडून सीबिल मागणाऱ्या बँकांना स्पष्ट इशारा दिला
. “शेतकऱ्यांना सीबिल मागू नका, याबाबत अनेकदा सूचना दिल्या आहेत. पण काही बँका अजूनही हे करत आहेत. हे बंद करा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असे मत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले
44.76 लाख कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडाही मंजूर करण्यात आला शेतकरी, उद्योजक आणि तरुणांसाठी संधी निर्माण करणे हे आपले ध्येय आहे आणि त्यासाठी बँकांची भूमिका महत्त्वाची आहे.
मुख्यमंत्र्यांनी ॲक्सिस, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकेच्या प्रतिनिधींना नाव घेऊन फटकारले आणि रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचा उल्लेख करत कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली.
“जर आज निर्णय घेतला नाही, तर भविष्यात गंभीर परिणाम होतील,” असे ते म्हणाले.तसेच, त्यांनी गडचिरोलीसारख्या भागांमध्ये उद्योग जाळे तयार होत असल्याचा उल्लेख करत बँकांनी आपल्या प्राथमिकता सरकारसोबत निश्चित करण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्राला स्टार्टअप हब बनवण्यासाठी बँकांनी अधिक सहकार्य करावे, असे आवर्जून सांगितले