बिबवेवाडी परिसरात व्यक्तीवर प्राणघातक हल्ला, आरोपी अटक…


पुणे: (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
बिबवेवाडी परिसरात १८ मे रोजी पहाटे एका २८ वर्षीय व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झाला. आरोपींनी हत्याराचा धाक दाखवून मारहाण केली आणि गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, इतर चार आरोपी फरार आहेत बिबवेवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. सुरज बेंद्रे या प्रकरणाचा तपास करत आहेत
फिर्यादीच्या दाजीने आरोपींविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती, ज्यामुळे आरोपींनी हा हल्ला केला.पोलिसांनी गणेश भालके, अक्षय भालके आणि देवा डोलारे यांना अटक केली आहे, तर इतर चार फरार आरोपींचा शोध सुरू आहे
.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश रवींद्र भालके (वय २४), अक्षय शैलेंद्र भालके (वय २३) आणि देवा मधुकर डोलारे (वय १९) यांनी आपल्या चार साथीदारांसह फिर्यादीवर हल्ला केला. आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली.
तसेच, एका आरोपीने पिस्तुलाने त्यांच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.