आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश… प्रशासनाने चऱ्होली येथे प्रस्तावित केलेली TP Scheme अखेर रद्द,


पिंपरी- : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने मौजे चऱ्होली येथे प्रस्तावित केलेली TP Scheme अखेर रद्द करण्यात आली. प्रशाससनाने आज तशी घोषणा केली आणि आगामी सर्वसाधारण सभेत त्या प्रस्तावाला मंजुरी देऊन ‘नोटिफिफकेशन’ काढण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी, भूमिपुत्र आणि स्थानिक नागरिकांच्या एकजुटीचा विजय झाला असून, भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश मिळले आहे
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. प्रशासनाने मौजे चिखली आणि चऱ्होलीसह शहरातील काही गावांमध्ये TP Scheme राबवण्याची योजना आखली होती. स्थानिक भूमिपुत्र आणि नागरिकांना विश्वासात न घेता ही Scheme लादण्याचा प्रयत्न सुरू होता.
या TP Scheme ला तीव्र विरोध करण्यात आला.दरम्यान, भाजपा आमदार महेश लांडगे यांनी भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी या TP Scheme विरोधात रान पेटवले. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्यासोबत तीन बैठका घेतल्या. शहराच्या स्थापनेपासून भूमिपुत्रांवर अन्याय झाला आहे
. सुरूवातीला एमआयडीसीए, त्यानंतर नवनगर प्राधिकरण आणि महापालिका हद्दीत समावेश झाल्यानंतरही विविध आरक्षणांसाठी शेतकऱ्यांच्या जमीनी घेतल्या आहेत.
आता TP Scheme च्या माध्यातून शेतकरी भूमिहीन होतील. त्यामुळे आमचा TP Scheme ला तीव्र विरोध आहे. तसेच, संपूर्ण शहराचा सुधारित विकास आराखडा (DP) तयार होत असताना TP Scheme चा आग्रह कशासाठी? असा प्रश्नही आमदार लांडगे यांनी उपस्थित केला होता
भूमिपुत्रांची एकजुट आणि आमदार महेश लांडगे यांची साथ यामुळे मौजे चिखली येथील TP Scheme रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला. त्यानंतर मौजे चऱ्होलीची TP Scheme रद्द करण्यासाठी महापालिका भवनासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांची बैठक झाली आणि शुक्रवारी, दि. 30 मे रोजी चऱ्होली बंदची हाक दिली होती.
माजी महापौर नितीन काळजे, सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर यांच्यासह ग्रामस्थांनी वज्रमुठ बांधली होती. विशेष म्हणजे, आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भूमिपुत्रांच्या हितासाठी निर्णय घ्यावा लागेल, अशी मागणीही केली. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नमते घेतले आणि चऱ्होलीची TP Scheme रद्द करण्यात येणार आहे
याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मौजे चऱ्होली येथील प्रस्तावित TP Scheme सुरू केलेल्या प्रक्रियेला स्थगिती दिली. भूमिपुत्र आणि आमदार महेश लांडगे यांनी सदर TP Scheme ला विरोध केला आहे. त्यामुळे प्रक्रिया स्थगित करीत आहोत. तसेच, प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन TP Scheme रद्दबाबत निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येईल.