दिवंगत महापौर भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानतर्फे हभप दत्तात्रय कुदळे यांना पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार जाहीर


हभप दत्तात्रय कुदळे यांना पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार जाहीर
दिवंगत महापौर कै. भिक वाघेरे पाटील प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी
पिंपरी वाघेरे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजनपेपरी, दि. 3 दिवंगत महापौर के. भिकू वाघेरे पाटील यांच्या 39 व्या स्मृतीदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार ह.भ.प. दत्तात्रय कुदळे याना जाहीर झाला आहे.
पुरस्कार वितरण सोहळा तसेच, रक्तदान शिबिर शुक्रवार (दि.6) पिंपरी वाघेरे येथील नवमहाराष्ट्र विद्यालय मैदान येथे सकाळी 9.30 वाजता आयोजित केले आहे, अशी माहिती दिवंगत महापौर के. भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त संजोग वाघेरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली
.मोरवाडी, पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेला प्रतिष्ठानचे विश्वस्त संजोग वाघेरे पाटील, सल्लागार अण्णा कापसे, सचिव बाळासाहेब वाघेरे, खजिनदार किसन वाघेरे, रमेश गोलांडे, बिपीन नाणेकर, अंकुश वाघेरे, जयवंत शिंदे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

संजोग वाघेरे पाटील यांनी सांगितले की, दिवंगत महापौर के भिकू वाघेरे पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते के. भिकू वाघेरे पाटील यांच्या पुतळ्यास सकाळी नऊ वाजता पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 9.30 वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले जाईल.
तसेच, परस्कार वितरण सोहळ्यात पिंपरी वासेरे येथील ह.भ.प. दत्तात्रय कुदळे यांना पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.
यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे, आमदार शकर जगताप, महेश लांडगे, उमा खापरे, अमित गोरखे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, माजी नगरसेवक राहुल कलाटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, स्थायी समितीचे माजी सभापती अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक डब्बू आसवानी तसेच, विविध पक्षांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे संयोजन दिवंगत महापौर के. भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठान व पिपरी वाधरे ग्रामस्थांनी केले आहे.