पिंपरी-चिंचवड शहर प्रस्तावित विकास आराखड्यातील (डीपी) काही आरक्षणांमुळे जनसामान्यांच्या हितावर गदा


पिंपरी- (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
शहराच्या विकासासाठी बनविण्यात आलेला हा डीपी आराखडा सामान्य नागरिकांचा कोणताही विचार न करता तयार करण्यात आला आहे. रहाटणी, थेरगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवडे नगर आणि बिजलीनगर येथील हजारो घरे यामुळे बाधित होत असून, अनेक संसार उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे. त्यामुळे हा आराखडा नागरिकांवर लादला जाऊ नये आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
बारणे कॉर्नर ते थेरगाव दरम्यान ‘निवारा हक्क संवाद यात्रे’चे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांच्या घरांवर बुलडोजर फिरवायला निघालेल्या प्रशासनाच्या निर्णयाला या आंदोलनात सहभागी होऊन नागरिकांनी तीव्र विरोध केला पिंपरी-चिंचवड शहर प्रस्तावित विकास आराखड्यातील (डीपी) काही आरक्षणांमुळे जनसामान्यांच्या हितावर गदा येत असल्याचा आरोप करत, त्याविरोधात आंदोलन करण्यात आले आहे
संवाद यात्रेत स्वाभिमान घर बचाव संघर्ष चळवळीचे अध्यक्ष धनाजी येळकर, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष पिंपरी-चिंचवड शहर इम्रान शेख, प्रमोद शिंदे, विशाल बारणे, हनुमान पिसाळ आदींसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनामुळे प्रशासनावर प्रस्तावित डीपी आराखड्याबाबत फेरविचार करण्यासाठी दबाव वाढला आहे.