”भाजपचे पुण्याचे महामंत्री प्रमोद कोंढरे” यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

पुणे (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)-

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुणे दौऱ्या दरम्यान एका धक्कादायक घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पुणे शहर महामंत्री प्रमोद कोंढरे यांच्यावर एका महिला पोलीस निरीक्षकाने विनयभंग केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी फरसखाना पोलीस ठाण्यात कोंढरे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सोमवारी (२३ जून) शनिवार वाड्याजवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर कसबा पेठचे आमदार हेमंत रासने काही कार्यकर्त्यांसह आणि बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसह चहा पिण्यासाठी जवळील दुकानात गेले होते.

त्याच दरम्यान, प्रमोद कोंढरे यांनी गर्दीचा फायदा घेत संबंधित महिला पोलीस निरीक्षकाला दोन वेळा अश्लील आणि लज्जा उत्पन्न करणारा स्पर्श केल्याचा आरोप आहे. यानंतर महिला अधिकाऱ्यांनी थेट वरिष्ठांकडे तक्रार केली.

या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहे. त्यानंतर चौकशीला अधिक वेग आला आहे.पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार प्रमोद कोंढरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्रमोद कोंढरे यांच्या विरोधात याआधी देखील विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर आता महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कोंढरेंच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे म्हणटले जात आहे.

Latest News