शिरढोण आणि खोणी येथील म्हाडा गृहप्रकल्पांतील घरांच्या सुधारित किमती जाहीर…


(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) मुंबई, ठाणे आणि कोकणातील सर्वसामान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाने आपल्या कोकण मंडळातील 6248 घरांच्या किमती कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे
. वाढत्या घरांच्या दरामुळे अनेकांना स्वतःचं घर घेणं अशक्य होत होतं. मात्र, आता शिरढोण आणि खोणी येथील म्हाडा गृहप्रकल्पांतील घरांच्या सुधारित किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. वाढत्या दरांमध्ये स्थिरता न मिळालेल्या अनेक कुटुंबांना आता आपल्या घराचे स्वप्न साकार करण्याचा उत्तम मार्ग उपलब्ध झाला आहे.
शिरढोण प्रकल्पातील घराच्या किंमतीत तब्बल 1 लाख 43 हजार 404 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर खोणी प्रकल्पातील घरांच्या किंमतीत 1 लाख 1 हजार 800 रुपयांनी घट झाली आहे‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर या सदनिका विक्रीस उपलब्ध असून, घर घेण्याची ही एक उत्तम संधी आहे.
या घडामोडींनंतर आणखी एक चांगली बातमी म्हणजे म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत जुलै महिन्यात 4000 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे.
यामध्ये कल्याण येथे 2500 घरे खासगी विकासकांकडून म्हाडाला प्राप्त होणार आहेत. उर्वरित 1500 घरे ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी उपलब्ध असतील.
दिवाळी दरम्यान म्हाडा मुंबई मंडळाकडून आणखी 5000 घरांची लॉटरी काढण्यात येणार असल्याची माहिती आहे घर खरेदीचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.