हिंजवडी परिसरात अक्षरशः ‘पाणीबाणी’ निर्माण झाल्याची स्थिती, मुख्यमंत्र्यांना लक्ष घालण्याची विनंती:आ लांडगे

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) – हिंजवडी आणि परिसरातील पायाभूत समस्या तसेच हिंजवडीचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करणे या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव यांनी तातडीने संबंधित सर्व विभागांना सोमवारी (दि 30) बैठकीसाठी बोलावले आहे.

वाकड पिंपरी चिंचवड रेसिडेंट डेव्हलपमेंट अँड वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली होती. त्यामध्ये हिंजवडीचा पिंपरी- चिंचवड महापालिकेत समावेश करावा आणि पायाभूत सुविधा शिक्षण करण्यासाठी मुख्यमंत्री यांचे लक्षवेधवे अशी मागणी केली होती

. मान्सूनपूर्व तसेच मोसमी पावसामुळे गेल्या महिन्याभरात हिंजवडी परिसरात अक्षरशः ‘पाणीबाणी’ निर्माण झाल्याची स्थिती होती. या समस्येमुळे या भागातील नागरिक, आयटीयन्स यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. आयटी पार्कमधील कर्मचारी वर्ग तासंतास रस्त्यावर अडकून पडला. याशिवाय वारंवार होणारी वाहतूक कोंडी, मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी #UNCLOGHinjawadiITPark ही स्वाक्षरी मोहीम सुरू केल्यानंतर याची दखल घेत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी घेतली थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष घालण्याची विनंती केली. यावर तात्काळ कार्यवाही सुरु झाली असून, प्रधान सचिव यांनी बैठक लावली आहे

Latest News