शक्तिपीठ महामार्गाचा घाट घातला जात आहे. तो रद्दच करा :खासदार विशाल पाटील

(पुणे :ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)-

शेतकऱ्यांना उध्वस्त करून टक्केवारी लाटण्यासाठीच शक्तिपीठ महामार्गाचा घाट घातला जात आहे. तो रद्दच झाला पाहिजे असा इशारा देत मंगळवारी नागपूर रत्नागिरी महामार्गांवर रास्ता रोको आंदोलन कारण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत महामार्ग रद्दच झाला पाहिजे त्यासाठी रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर असा निर्वाणीचा इशारा खासदार विशाल पाटील आणि स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला

शक्तिपीठमुळे सांगली परिसरातील गावांना महापुराचा धोका वाढणार आहे. ही लढाई जशी रस्त्यावर राहील तशी आमच्या गावात आणि शेतात राहील. त्याचा पहिला हिसका गावात आलेल्या अधिकाऱ्यांना दाखवला आहे. पुढेही दाखवु पण महामार्ग होउ देणार नाही. आमची शेती वाचवु. त्यासाठी रक्त सांडायची देखिल तयारी आमची आहे. असे मत खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केले

आंदोलना दरम्यान महेश खराडे यांच्यासह भरत चौगुले, श्रीधर उदगावे, उमेश एडके, भूषण गुरव, प्रदीप माने, महावीर चौगुले शांतीनाथ लिंबेकाई आदींना अटक करण्यात आली, नंतर त्यांची सुटका झाली

आम्ही विकासाच्या विरोधात नाही. मात्र या महामार्गांवर अनेक ठिकाणी अवाढव्य पूल होत आहेत. त्यामुळे याचा अभ्यास करण्याची गरज आहे.

किती भराव टाकला जाणार आहे, त्यामुळे महापूर काळात किती पाणी येईल त्याचा किती शहरे आणि किती गावांना फटका बसणार आहे

याचा विचार करण्याची गरज आहे. या सर्व बाबींचा विचार सरकारने करण्याची गरज आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वत:चे स्वप्न पुर्ण करण्याकरिता शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवणार असतील तर महाराष्ट्रातील शेतकरी अशी हुकुमशाही प्रवृत्ती चालु देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला

या आंदोलनाचे नेतृत्व खासदार विशाल पाटील, स्वाभिमीनीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, सर्व पक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांनी केले. शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी बचाव समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. भर पावसात महिलासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.पावसातही शेतकरी तसुभ ही जागचे हलले नाहीत. कोल्हापूर जिल्ह्याइतकाच जोरदार विरोध सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या रास्ता रोकोच्या माध्यमातून दाखवून दिला. रस्त्याच्या दुतर्फा पाच ते सहा किलोमीटरच्या वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. शेती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, या सरकारचे करायचे काय खाली मुंडी वर पाय अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी अंकली येथील जैन वडा चौकात रस्त्यावरचं ठिय्या मारला, यात महिला शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय होती. यावेळी प्रभाकर तोडकर, प्रवीण पाटील, उमेश एडके, शुभगिनी शिंदे, लता कांबळे, बाळासाहेब पाटील आदिंनी मनोगत व्यक्त केले. यावेळी यशवंत हारूगडे, रघुनाथ पाटील, अधिक पाटील, विष्णू पाटील, भरत चौगुले, श्रीधर उदगावे, अनिल माळी, अरुण पाटील, एकनाथ कोळी, बाळासाहेब लिंबेकाई, सुधाकर पाटील, रावसाहेब पाटील, अरुण कवठेकर, संतोष आंबी, आदी उपस्थित होते.महेश खराडे म्हणाले, कृषी दिना दिवशीच शेतकऱ्यांना रस्त्यावर बसावे लागते ही शोकांतिका आहे. वर्धा-गोवा अर्थात शक्तिपीठ महामार्गची कुणाचीही मागणी नाही, ना शेतकऱ्यांची, ना भाविकांची, मग कुणाचीही मागणी नसताना कुणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी का उध्वस्त व्हायचे, शेतकऱ्यांनी का भूमिहीन व्हायचे, शेतकऱ्यांनी का कवडीमोल किमतीने जमिनी द्यायच्या हा खरा सवाल आहे. महामार्गसाठी शासन 20 हजार कोटीचे कर्ज काढणार आहे. त्यामुळे राज्य आणखी कर्जबाजारी होणार आहे. त्यामुळे हा महामार्ग करू नये असा अभिप्राय दिला आहे म्हणजेच अर्थ खात्याचा विरोध, शेतकऱ्यांचा विरोध असतानाही तो डावलून पोलिसी बळाचा वापर करून मोजणी प्रक्रिया सुरु आहे. हा अट्टाहास कशासाठी सुरु आहे.

Latest News