पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा, PMPLचे स्टियरिंग आता ठेकेदारांच्या हाती…


पुणे: (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
– सध्या पीएमपीचे स्व मालकीचे १ हजार २५ बस असून ठेकेदारांचे १ हजार १७३ बस आहेत. येत्या काही महिन्यात पीएमपीमध्ये १ हजार नवीन सीएनजी बस दाखल होणार आहेत. त्यावेळी ठेकेदारांची बस संख्या ही २ हजार १७३ होईल. पीएमपीत ठेकेदारांचे वाढते वर्चस्व हे नक्कीच सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने नुकसानदायक ठरणार आहे
.पीएमपीच्या ताफ्यात सध्या एकूण २,१९८ बस आहेत. यापैकी १,१७३ बस ठेकेदारांच्या मालकीच्या आहेत, तर १,०२५ बस पीएमपीच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत. सध्या ४९० इलेक्ट्रिक बस, १,२८१ सीएनजी बस आणि २२७ डिझेल बस पीएमपीमध्ये कार्यरत आहेत. यापैकी ७९८ सीएनजी आणि सर्व २२७ डिझेल बस पीएमपीच्या मालकीच्या आहेत,
तर ४९० इलेक्ट्रिक व ४८३ सीएनजी बस ठेकेदारांच्या आहेत.आता लवकरच १,००० नवीन सीएनजी बस ताफ्यात दाखल होणार असून त्या सर्व ठेकेदारांच्या मालकीच्या असणार आहेत.
त्यामुळे पीएमपीच्या बस व्यवस्थापनात खाजगीकरणाचा झपाट्याने शिरकाव होत असल्याचे स्पष्ट दिसून येते.पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा म्हणून पीएमपीला ओळखले जाते. रोज सुमारे ११ लाख प्रवाशाना आपल्या इच्छित स्थळी पोहचविणाऱ्या या पीएमपीचे स्टियरिंग आता ठेकेदारांच्या हाती जात आहे
. सार्वजनिक वाहतुकीचे खासगीकरण हे शहराच्या गरिब व मध्यमवर्गीय प्रवाशांसाठी दीर्घकालीन दृष्टीने धोका ठरू शकते. ठेकेदारांचा उद्देश नफा असतो, सेवा दर्जा नव्हे. त्यामुळे बस वेळापत्रक, देखभाल, चालक-वाहकांचे प्रशिक्षण आणि प्रवाशांच्या तक्रारी याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते.
वाहतूक तज्ञ ?
सेवेच्या दर्जावर परिणाम : “खाजगी ठेकेदारांचा प्रमुख उद्देश नफा असतो. त्यामुळे देखभाल, वेळेचे पालन, प्रवाशांच्या सोयी याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता अधिक.”
आराखड्यावर नियंत्रण :जेव्हा बस मालकी खाजगी असते, तेव्हा वाहतुकीच्या वेळापत्रकावर व मार्ग नियोजनावर पीएमपीचे नियंत्रण झपाट्याने कमी होते.
कामगारांचे शोषण : ठेकेदारांच्या बसमध्ये काम करणाऱ्या चालक व वाहकांना वेतन, सेवा शर्ती व सुरक्षितता कमी असते. त्यामुळे कर्मचारी असंतोष वाढतो.”तक्रार निवारण यंत्रणा अशक्त :पीएमपीची बस असेल तर प्रवाशांना थेट पीएमपीकडे तक्रार करता येते, पण ठेकेदार बसेल तर त्याच्यावर कारवाईचे प्रमाण कमी अथवा सौम्य स्वरूपाचे असते.
सध्याची बस मालकी स्थिती
बस प्रकार पीएमपी ठेकेदार एकूण
- इलेक्ट्रिक ० ४९० ४९०
- सीएनजी ७९८ ४८३ १२८१
- डिझेल २२७ ० २२७
- एकूण १०२५ ११७३ २१९८