माळेगाव साखर कारखान्याचे सर्वानुमते अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार


(पुणे :ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) – बारामतीच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे बहुचर्चित निवडणूकीची मतमोजणी 24 जून रोजी पार पडली. साखर कारखान्यावर सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शरद पवार यांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे आणि शेतकरी संघटनेचे चार पॅनल रिंगणात होते.
या निवडणुकीचा निकाल समोर आला असून, उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झाले आहेत.
नीरावागज गटातून अविनाश देवकाते, विलास देवकाते, जयपाल देवकाते या तिघांपैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर या तिघांशिवाय महिला राखीवमधून निवडून आलेल्या संगीता कोकरे किंवा ज्योती मुलमुले या दोघींपैकी एकीला उपाध्यक्ष पदाची संधी मिळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे
. त्यामुळे उपाध्यक्ष पद निरावागच गटामध्ये मिळणार की पणदरे गटामध्ये मिळणार, हे निवडीमध्ये स्पष्ट होणार आहे
संपूर्ण राज्यात चर्चेत असलेल्या माळेगाव सहकारी कारखान्याच्या अध्यक्षपदाची निवडणूक शनिवारी (दि.5) होणार असून, जाहीर केल्याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष होणार आहेत.
तर उपाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली श्री नीलकंठेश्वर पॅनलने २१ पैकी २० जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व राखले आहे.
या निवडणुकीमध्ये विरोधी गटातील सहकार बचाव पॅनलचे चंद्रराव तावरे हे एकमेव उमेदवार विजयी झाले. मात्र, सर्व जागांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह २० उमेदवारांनी विजय मिळवला.दरम्यान, माळेगाव कारखान्याचा अध्यक्ष मी स्वतः होणार असल्याचे अजित पवार यांनी भाषणात सांगितले होते
. त्यानुसार, त्यांनी आभार मेळाव्यात देखील आपल्या भूमिकेचा पुनरूच्चार करत आपण कारखान्याचे अध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट केले होते.
त्यानुसार, शनिवारी (दि.5)संचालक मंडळाची बैठक होणार आहे.या बैठकीमध्ये प्रांतधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये सर्वानुमते अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार विराजमान होणार आहेत. मात्र, उपाध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.