भक्ती-शक्ती मार्गावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात चाळण: -BJP चिटणीस सचिन काळभोर

पिंपरी : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)- पिंपरी ते निगडी दरम्यानच्या भक्ती-शक्ती मार्गावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, संपूर्ण रस्त्याची चाळण झाली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर असलेल्या या प्रमुख रस्त्याने नागरिकांचा जीव मुठीत गेला आहे. नागरिकांनी देखील या समस्येवर तीव्र संताप व्यक्त केला असून, जर वेळेत उपाययोजना न झाल्यास “निगडी टिळक चौकात रस्त्यावर झोपून आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा भाजपा चिटणीस कळभोर यांनी दिला आहे

रस्त्यावर पाणी साचल्याने खड्डे नजरेस न पडता अपघात होण्याची शक्यता वाढली असून अनेक नागरिक संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी महापालिका प्रशासनाला ठणकावून मागणी केली आहे

की, “निगडी बीआरटी बसस्टॉप ते आकुर्डी खंडोबा माळ दरम्यानच्या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.” त्यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्यावर दुर्लक्षाचा आरोप करत, तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांचा जीव धोक्यात न येण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे

.मधुकर पवळे उड्डाणपूलाजवळील बीआरटी बस थांबा ते आकुर्डी खंडोबा माळ या दरम्यानचे रस्त्याचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने व पावसाळ्यात योग्य देखभाल न झाल्याने खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या परिस्थितीतून जबाबदारीची ढकलाढकली सुरू झाली आहे. मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू असल्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि मेट्रो प्रशासन यांच्यात दुरुस्तीचे खापर एकमेकांवर फोडले जात आहे.

Latest News