MIT महाविद्यालयातील प्रा. अक्षदा पांडुरंग कुलकर्णी त्यांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यापीठाने पीएचडी प्रदान…

ps logo rgb

पिंपरी-चिंचवड : प्रा. अक्षदा कुलकर्णी यांनी या समस्येवर काम करत, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने एक अभिनव अल्गोरिदम तयार केला आहे, ज्यामुळे ड्रोनच्या आकार, गती आणि दिशेची अचूक ओळख करता येईल. हे अल्गोरिदम सुरक्षा क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरू शकते. मानवरहित हवाई वाहने किंवा ड्रोनला ओळखणे आणि त्यांचा मागोवा घेणे हे क्षेत्रातील एक मोठे आव्हान आहे. प्रा. अक्षदाच्या या संशोधनामुळे हे आव्हान सुलभ होईल, तसेच राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाची सुविधा प्रदान केली जाईल.या संशोधन कार्यात प्रा. अक्षदा कुलकर्णी यांना डॉ. अतुल नेवसे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. डॉ. नेवसे यांच्या मार्गदर्शनामुळेच या अल्गोरिदमच्या विकासाला गती मिळाली आणि संशोधनाचा दर्जा उंचावला. विद्यापीठाचे कुलगुरू व मार्गदर्शक प्राध्यापकांनी या कार्याचे कौतुक करत सांगितले की, “हे संशोधन केवळ देशाच्या सुरक्षेसाठीच नाही, तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विकासासाठी देखील अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल.”एम. आय. टी. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील प्रा. अक्षदा पांडुरंग कुलकर्णी यांनी आपल्या संशोधन कार्याने एक मोठा टप्पा गाठला आहे. त्यांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यापीठाने पीएचडी प्रदान केली आहे. त्यांच्या ‘मानवरहित हवाई वाहने शोधण्यासाठी आणि त्यांचा मागोवा घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अल्गोरिदम’ या संशोधनावर आधारित पीएचडी कामाने प्रा. अक्षदा यांनी तंत्रज्ञान आणि सुरक्षा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.या अल्गोरिदममध्ये ड्रोनच्या आकार, गती, दिशा आणि स्थान ओळखण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ करण्यात आली आहे. आधुनिक काळात लहान ड्रोन किंवा मानवरहित हवाई वाहने विविध उद्देशांसाठी वापरली जातात, पण त्यांचा सुरक्षिततेसाठी उपयोग आणि संभाव्य गैरवापर एक मोठे धोका बनू शकतात. या ड्रोनचा वापर संशोधन, छायाचित्रण, शेती, औद्योगिक क्षेत्रात होतोच, मात्र त्यांचा गैरवापर सुरक्षा क्षेत्रासाठी मोठा धोका निर्माण करतो. महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. वाफारे, सहकारी प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी प्रा. अक्षदा कुलकर्णी यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.