प्रारूप मतदार याद्यांमध्ये झालेला घोळ हा केवळ तांत्रिक त्रुटींचा प्रश्न नाही, तर लोकशाहीवर केलेला थेट प्रहार.– तुषार कामठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प.)

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रारूप मतदार याद्यांमध्ये केलेल्या प्रचंड घोळामुळे लोकशाही व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मतदार याद्यांतील त्रुटी, अनियमितता आणि जाणीवपूर्वक केलेला गैरव्यवहार हा सरळसरळ संविधानाचा आणि लोकशाहीचा अवमान आहे.याच अन्यायाविरोधात व लोकशाहीचे रक्षण करण्याच्या निर्धाराने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष), अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच सर्व समविचारी पक्षांनी आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसमोर भव्य निषेध आंदोलन केले.न्याय, पारदर्शकता आणि संविधानिक मूल्यांसाठी लढा देण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आवाज बुलंद केला.
नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार या आंदोलनातून दिसून आला, असेही कामठे यांनी म्हटले आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रसिद्ध केलेल्या प्रारुप मतदार याद्यांमध्ये अनेक त्रुटी आहेत. हा मतदार याद्यांचा घोळ सत्ताधारी भाजपाने हेतुपुरस्सर घातला आहे. याविरोधात महाविकास आघाडीच्या माध्यमातून पिंपरी चौकात आंदोलन करण्यात आले.तुषार कामठे म्हणाले की, “प्रारूप मतदार याद्यांमध्ये झालेला घोळ हा केवळ तांत्रिक त्रुटींचा प्रश्न नाही, तर लोकशाहीवर केलेला थेट प्रहार आहे. संविधान आणि नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आम्ही एकजुटीने उभे आहोत, आणि हा अन्याय कधीही सहन केला जाणार नाही.
यावेळी या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रीय काँग्रेस पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष कैलास कदम, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी संयुक्तपणे केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माजी नगरसेविका डॉ. सुलक्षणा शिलवंत धर, वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. धम्मराज साळवे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे, महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, माजी नगरसेविका प्रियंका बारसे, सोनाली पासलकर कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, उपाध्यक्ष काशिनाथ जगताप ,कार्याध्यक्ष संतोष कवडे, सरचिटणीस जयंत शिंदे,
पिंपरी विधानसभा अध्यक्ष श्रीमंत जगताप, सचिव योगेश सोनवणे, अॅड. विजय बाबर, संदेश जगताप, काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष मयूर जयस्वाल, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, युवक काँग्रेसचे प्रवक्ते गौरव चौधरी, डॉ. मनीषा गरुड, सोमनाथ शेळके, मिलिंद फडतरे, शिवसेनेचे नेते रोमी संधू , विजय गुप्ता, युवराज कोकाटे, सुषमा शेलार, तुषार नवले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
