भाजप पिंपरी चिंचवड जिल्हा निवडणूक संचालन समिती जाहीर

पिंपरी : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची पिंपरी चिंचवड जिल्हा निवडणूक संचालन समिती जाहीर करण्यात आली आहे. या समितीच्या संयोजकपदी आमदार अमित गोरखे तर सहसंयोजकपदी संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राजकीय व संघटनात्मक दृष्टीने महत्वाची असलेल्या या समितीच्या अध्यक्षपदी शिष्टाचाराप्रमाणे शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे हे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.निवडणूक कालखंडात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबविणे, पक्षाचा जाहीरनामा तयार करणे, समाजातील विविध घटकांशी संवाद प्रस्थापित करणे, इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन करणे आणि प्रचार यंत्रणा कार्यान्वित करणे या समितीच्या प्रमुख जबाबदाऱ्यांमध्ये समाविष्ट आहे.या समितीत विविध कार्यक्षेत्रांसाठी प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे —
जाहीरनामा प्रमुख: अमोल देशपांडेमहायुती मित्र पक्ष समन्वयक: सदाशिव खाडेप्रचार यंत्रणा समन्वयक: विजय फुगेनिवडणूक आयोग संपर्क प्रमुख: राजेश पिल्ले
विरोधकांसाठी आरोप पत्र प्रमुख: विलास मडीगेरीविशेष संपर्क प्रमुख: संजय मंगोडेकर
तसेच, सरचिटणीस विकास डोळस, वैशाली खाडे, मधुकर बच्चे, सुजाता पालांडे, दिनेश यादव, कुणाल लांडगे, माऊली थोरात, राजू दुर्गे, सत्यनारायण चांडक, संजय परळीकर, गोपाळ माळेकर, गोरक्षनाथ झोळ, राजू मासुळकर, गुलाब बनकर, अजित भालेराव, मनोज ब्राह्मणकर, अजित कुलथे, अभिजीत बोरसे, दीपक नागरगोजे, अमेय देशपांडे, सचिन राऊत, सागर फुगे, समीर जावळकर, कैलास सानप आणि भूषण जोशी या पदाधिकाऱ्यांनाही समितीत जबाबदाऱ्या प्रदान केल्या आहेत.शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी समितीची घोषणा करण्यापूर्वी आमदार महेशदादा लांडगे, शंकरभाऊ जगताप, अमित गोरखे, उमाताई खापरे तसेच माजी खासदार अमर साबळे आणि माजी आमदार अश्विनीताई जगताप यांच्याशी चर्चा करून समतोल राखत ही घोषणा केली असल्याची माहिती शहर प्रवक्ते कुणाल लांडगे यांनी दिली.

