नर्तिका पूजा गायकवाडला बार्शी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर

ps logo rgb

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) 9 सप्टेंबर 2025 रोजी बीड जिल्ह्यातील लुखामसला येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आत्महत्या करून जीवन संपवले होते. त्यांनी बार्शी तालुक्यातील पूजा गायकवाडच्या (Pooja Gaikwad) घराबाहेर स्वतःच्या कारमध्ये रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून घेतली होती.

त्यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणात पूजा गायकवाडला अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून ती न्यायालयीन कोठडीत होती.जामिनासाठी पूजाच्या वतीने अॅड. धनंजय माने यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. त्यांनी सांगितले की, पूजाला केवळ संशयावरून या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे

. मृताने कोणतीही आत्महत्येची चिठ्ठी मागे ठेवलेली नाही तसेच पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीला तुरुंगात ठेवण्याला काही अर्थ उरत नाही, असे त्यांनी न्यायालयासमोर मांडले. हा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने पूजाला जामीन मंजूर केला. 

राज्यभर खळबळ उडवणाऱ्या उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्याप्रकरणात महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून अटकेत असलेल्या नर्तिका पूजा गायकवाडला बार्शी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

तब्बल दोन महिन्यांपासून चाललेल्या सुनावणी प्रक्रियेनंतर न्यायालयाने सोमवारी हा निर्णय दिल्याने या प्रकरणाला नवा कलाटणी मिळाल्याचे मानले जात आहे. (Pooja Gaikwad Bail) तपासानुसार, गोविंद बर्गे(Govind Barge) यांना तमाशाचा छंद होता आणि त्यातूनच त्यांची पूजा गायकवाडशी दीड वर्षांपूर्वी ओळख झाली. ही ओळख पुढे मैत्रीतून प्रेमात बदलली आणि गोविंद बर्गे यांनी पूजेला मोबाईल, दागिने तसेच तिच्या नातेवाईकांच्या नावावर जमीनही केली होती. (Pooja Gaikwad Bailमात्र काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात मतभेद निर्माण झाले.

पूजाने गोविंद यांच्याकडे बीडमधील बंगला तिच्या नावावर करण्याची आणि तिच्या भावाच्या नावावर शेती करण्याची मागणी केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. ही मागणी पूर्ण न केल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप होता. यामुळे गोविंद मानसिकदृष्ट्या खचले होते, अशी माहिती दिली आहे.

आत्महत्येच्या आधीच्या रात्री गोविंद बर्गे पूजा गायकवाडच्या (Pooja Gaikwad) घरी गेले होते. त्याठिकाणी नेमके काय घडले याचा तपास अद्याप सुरू असून, पुढील तपासात अनेक महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्यांचा मृतदेह कारमध्ये लॉक अवस्थेत मिळाला होता आणि प्राथमिक तपासात त्यांनी स्वतःवरच गोळी झाडल्याचे दिसून आले पूजा गायकवाड जामीनावर बाहेर आली असली तरी, या प्रकरणातील न्यायालयीन लढाई अजून संपलेली नाही. पोलीस तपास आणि गुप्त चौकशीचे निष्कर्ष पुढील काही दिवसांत समोर येण्याची शक्यता आहे.

Latest News