MHADA पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये असलेल्या स्वप्नातील घर घेण्यासाठी अनेकजण उत्सुक…

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) गेल्या २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी अर्ज भरताना आलेल्या तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रे पडताळणीतील विलंबाच्या तक्रारींची दखल घेऊन, मंडळाने अर्ज स्वीकारण्यास अंतिम मुदतवाढ दिली आहे. तांत्रिक अडचणी आणि अर्जदारांच्या मागणीमुळे म्हाडा पुणे मंडळाने अर्ज स्वीकारण्यास अंतिम मुदतवाढ दिली आहे.त्यानुसार, ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तसेच ऑनलाईन अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख आता ३० नोव्हेंबर २०२५ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत) असणार आहे. जे अर्जदार RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम भरणार आहेत, त्यांच्यासाठी ०१ डिसेंबर २०२५ (संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत) ही अंतिम मुदत आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार, ४,१८६ सदनिकांसाठी असलेली संगणकीय सोडत आता ११ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२:०० वाजता काढण्यात येईल.
अर्जदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता
म्हाडा पुणे मंडळाने स्पष्ट केले आहे की, ही अर्ज करण्याची शेवटची संधी आहे. अर्जदारांनी कोणत्याही एजंट किंवा सल्लागारांवर विश्वास ठेवू नये, कारण सोडत प्रक्रिया पूर्णपणे संगणकीय आणि पारदर्शक आहे. या मुदतवाढीमुळे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अर्जदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
घराचे स्वप्न साकार होणार
म्हाडाच्या या सोडतीला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये असलेल्या स्वप्नातील घर घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. एका घरासाठी ४३ अर्जदारांची स्पर्धा असल्याने या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. म्हाडाने तांत्रिक अडचणींवर मात करत मुदतवाढ दिल्याने अधिकाधिक नागरिकांना अर्ज करण्याची संधी मिळाली आहे. आता अर्जदारांनी कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराला बळी न पडता, केवळ अधिकृत संकेतस्थळाद्वारे माहिती घेऊन ३० नोव्हेंबरच्या अंतिम मुदतीपूर्वी आपला अर्ज पूर्ण करावा. जेणेकरून ११ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या संगणकीय सोडतीमध्ये त्यांचे घराचे स्वप्न साकार होऊ शकेल, असे आवाहन केले जात आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने काढलेल्या ४,१८६ घरांच्या सोडतीला अर्जदारांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. तांत्रिक कारणांमुळे दोनदा मुदतवाढ मिळालेल्या या सोडतीसाठी आतापर्यंत १,८२,७८१ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यापैकी १,३३,८८५ अर्जदारांनी अनामत रक्कम भरून अर्ज पूर्ण केले आहेत. या विक्रमी प्रतिसादामुळे एका घरासाठी सरासरी ४३ जणांनी अर्ज केले आहेत.
सप्टेंबर महिन्यात ४,१८६ घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध
म्हाडा पुणे मंडळाने सप्टेंबर महिन्यात ४,१८६ घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. यात प्रामुख्याने २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ३,२२२ घरे आणि १५ टक्के एकात्मिक योजनेतील ८६४ घरे यांचा समावेश आहे. ११ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेला विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे. पुणे आणि परिसरात स्वतःचे घर घेण्याची नागरिकांची तीव्र इच्छा यातून दिसून येते.
