श्रीमती कोंडाबाई गोलांडे प्राथमिक विद्यालयास पंधरा संगणक….भेट

पिंपरी चिंचवड : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा नुसार कौशल्यावर आधारित शिक्षणासाठी कोडिंग, संगणक साक्षरता, या सारख्या विषयाचे मार्गदर्शन देण्यासाठी या संगणकाचा वापर निश्चितच विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल. असे प्रतिपादन मुख्याध्यपिका उज्वला चौधरी यांनी केले.
सांगवी परिसर महेश मंडळ व कोहेसिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने चिंचवड येथील श्रीमती कोंडाबाई गोलांडे प्राथमिक विद्यालयास १५ संगणक व विज्ञान प्रयोगशाळेचे साहित्य देण्यात आले.अद्यावत संगणक कक्षाचे उद्घाटन कंपनीचे अधिकारी फरीदुद्दीन शेख, अश्विन आपटे, धनंजय संकपाळ आदीच्या हस्ते फीत कापून करण्यात आले
. या वेळी सांगवी परिसर महेश मंडळाचे सतीश लोहिया, मुकुंद तापडिया उपस्थित होते.सतीश लोहिया म्हणाले कि संगणक लॅब मुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, राष्ट्रीय, सांस्कृतिक विकासाला निश्चितच चालना मिळेल. मुख्याध्यापिका उज्ज्वला चौधरी, विद्या सोनवणे, लता डेरे आणि शिक्षक वर्ग यांनी या साहित्याचा स्वीकार केला .
