राहुल कलाटे यांना भाजपा मध्ये प्रवेश दिल्यास वाकड प्रभागात बंडखोरी अटळ : भाजपा शहर उपाध्यक्ष राम वाकडकर

oplus_2

oplus_2

oplus_2

राहुल कलाटे यांना भाजपा मध्ये प्रवेश दिल्यास वाकड प्रभागात बंडखोरी अटळ : भाजपा शहर उपाध्यक्ष राम वाकडकर

पिंपरी (ऑनलाईन न्यूज परिवर्तनाचा सामना ) वाकड मधील प्रभाग क्रमांक 25 मध्ये माजी नगरसेवक राहुल कलाटे यांना भाजपा मध्ये प्रवेश देऊन त्यांना तिकीट दिल्यास वाकड मधील भाजपा इच्छुक राम वाकडकर बंडखोरी करणार असल्याचा पत्रकार परिषदेत सांगितलं

: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाकड येथील स्थानिक नेते राहुल कलाटे व अन्य पक्षातील नेत्यांच्या भाजप पक्षप्रवेशाला तीव्र विरोध व्यक्त करण्यासाठी माजी नगरसेवक विनायक गायकवाड, भाजपचे शहर उपाध्यक्ष विशाल कलाटे, राम वाकडकर, भाजपा ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष चेतन भुजबळ, महिला मोर्च्याच्या प्रदेश पदाधिकारी भारती विनोदे, राहुल काटे, नवनाथ ढवळे व इतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत प्रभाग क्रमांक २५ मधून पक्षाच्या धोरणाविरोधात बंडखोरी करण्याच्या भूमिकेत ते असल्याचे जाहीर करण्यात आले आहे

या परिषदेत ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आपली भूमिका मांडून कलाटे यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध करणार असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या अनेक वर्षापासून पक्षाचे काम करणाऱ्या निष्ठावंतांना डावलून आयाराम ग्यारामाना प्राथमिकता देणं अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राहुल कलाटे यांचा इतिहास व राजकिय पार्श्वभूमी पाहता त्यांनी आपल्या सोयीनुसार अनेक पक्षांची वारी केली असून तेआतापर्यंत कोणाशीही एकनिष्ठ राहिले नाहीत. स्वार्थासाठी मलीन प्रतिमा असलेल्या या नेत्याला गत निवडणुकीत स्वतःचे डिपॉझिट देखील वाचवता आले नाही. स्थायी समिती सभेत या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने एका महापालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्याला देखील यापूर्वी मारहाण केलेली आहे

.यावेळी भाजपचे शहर उपाध्यक्ष राम वाकडकर म्हणाले, “वाकड भागातील स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा राहुल कलाटे यांच्या पक्षप्रवेशाला पूर्णपणे विरोध आहे. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाच्या अंतर्गत एकजुटीला व प्रतिमेला धक्का बसेल शी खंत राम वाकडकर यांनी व्यक्त केली

स्थानिक नेत्यांच्या मताचा विचार करावा…आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाच्या यशावर परिणाम होऊ शकतो. आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना या परिषदेतून आमची भूमिका स्पष्टपणे सांगणार आहोत. जर आमच्या भूमिकेचा आदर झाला नाही, तर आम्ही मोदीजी आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या मूल्यांना जपतच बंडखोरीचा मार्ग अवलंबू शकतो. हे पक्षाच्या हितासाठीच करणार आहोत.”

या पत्रकार परिषदेत भाजपचे इतर पदाधिकारी देखील सहभागी झाले होते असून, ते वाकड भागातील स्थानिक समस्या, पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना आणि कलाटे यांच्या प्रवेशाच्या संभाव्य परिणामांवर भूमिका मांडत पक्षाच्या एकतेसाठी आणि निवडणुकीच्या यशासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भाजपचे पदाधिकारी या परिषदेतून पक्षाच्या वरिष्ठांना आवाहन करत म्हणाले की, स्थानिक नेत्यांच्या मताचा विचार करून निर्णय घ्यावा, जेणेकरून पक्ष संघटना आणि शहरात पक्षाची ताकद मजबूत राहील आणि महापालिका निवडणुकीत सहज विजय मिळवता येईल.

Latest News