संघटन मजबूत; पक्षावरील विश्वास वाढतोय – आमदार शंकर जगताप 

Backup_of_ps logo rgb

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

पिंपरी, २ जानेवारी ( प्रतिनिधी): (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाचे संघटन दिवसेंदिवस मजबूत होत असून पक्षावरील विश्वास वाढत असल्याचे पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांच्या उपस्थितीत गुरुवारी पिंपळेगुरव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शोभा संभाजी पगारे धर्मशाळे, झोपडपट्टी सेल अध्यक्ष सुनिता अशोक अडसुळे, युवा नेते देवदत्त ऊर्फ सनी धर्मशाळे तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रदीप काशिनाथ भिंगारे यांनी पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.

यावेळी बोलताना आमदार शंकर जगताप म्हणाले, या सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या ध्येय-धोरणांवर विश्वास व्यक्त करत, सर्वसामान्य व वंचित घटकांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. “तुमची आमची भाजपा – सर्वांची भाजपा” या भावनेतून भाजपामध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. या पक्षप्रवेशामुळे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे संघटन अधिक बळकट होणार असून आगामी काळात पक्षाला बळकटी मिळणार असल्याचे चित्र आहे.


Latest News