स्वतःचे घर भरण्यासाठी नव्हे,तर केवळ समाजासाठी काम करत आलोय, संदीप वाघेरे यांचे प्रतिपादन

पिंपरी : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) परमेश्वराने मला खूप काही दिले आहे. त्यामुळे स्वतःचे घर भरण्यासाठी नव्हे तर केवळ समाजासाठी मी काम करत आलो आहे असे प्रतिपादन माजी नगरसेवक व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे यांनी येथे केले. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग क्रमांक 21 मधून संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे व निकिता कदम यांना उमेदवारी दिली आहे. या पॅनलच्या वतीने पिंपरी गावातील माळी आळी, कापसे आळी, पवनेश्वर मंदिर, विशाल कापसे निवास, पवना आळी, शिंदे आळी,भैरवनाथ मंदिर, कुंभारवाडा,खराडे वाडा, नानेकर चाळ,वाघेरे आळी, जोग महाराज वाडा,माळी आळी,गव्हाणे आळी,सविता अपार्टमेंट अशी पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी महिलांनी संदीप वाघेरे यांच्यासह सर्व उमेदवारांना औक्षण करून शुभेच्छा दिल्या. यावेळी वाघेरे बोलत होते.
यावेळी वाघेरे म्हणाले की, मी घर भरण्यासाठी नव्हे तर समाजासाठी काम करत आलो आहे. त्यासाठी स्वतःच्या खिशातून चार पैसे खर्च केले. कोरोना काळात रुग्णांना
मदत व्हावी म्हणून स्वखर्चातून 75 लाखाचे बेड व्हेंटिलेटर मशीन आदी वैद्यकीय साहित्य जिजामाता रुग्णालयाला दिले. पिंपरी गावचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. वंचित घटकांसाठीही काम केले. अजून खूप काही करायचे आहे त्यासाठी पॅनेल मधील सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन वाघेरे यांनी या पदयात्रे दरम्यान केले. या पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या पदयात्रेत अमोल गव्हाणे, सोनू कदम, अक्षय नाणेकर,अनिकेत मापारी, अभिजीत चव्हाण, प्रतीक भूमकर,श्री कुदळे,आशु आसवानी, हरी पारखे,शरद खोतकर,अभिजीत शिंदे, कुणाल सातव,अजिंक्य कुदळे, राहुल कुदळे, सुनील कुदळे रुपेश कुदळे, प्रवीण कुदळे आदी हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
