पिंपरी गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलचा झंजावाती प्रचार * ज्ञानेश्वर नगरी अशोक थिएटर परिसरात आयोजित प्रचार रॅलीस उदंड प्रतिसाद

1005714564

पिंपरी गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलचा झंजावाती प्रचार * ज्ञानेश्वर नगरी अशोक थिएटर परिसरात आयोजित प्रचार रॅलीस उदंड प्रतिसाद

पिंपरी दि. 6 (प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी नगरसेवक संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे, निकिता कदम यांच्या प्रचारार्थ ज्ञानेश्वर नगरी अशोक थिएटर चौक परिसरात प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीस उदंड प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी महिला भगिनींनी औक्षण करून पॅनलला विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

वृषाली हॉटेल, डांगे चाळ, ज्ञानेश्वर नगरी, अतिथी हॉटेल, अशोक थिएटर,पॉवर हाऊस भागात काढण्यात आलेल्या या प्रचार फेरी तरुण वर्ग व महिला वर्गाचा मोठा सहभाग होता.

यावेळी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विविध विकास कामांचा धावता आढावा घेतला. पदावर असो अथवा नसो सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे असे वाघेरे यांनी सांगितले.

या प्रचार फेरीत शिक्षण मंडळाच्या माजी सभापती गिरिजा कुदळे , प्रवीण कुदळे, अजिंक्य कुदळे, सुनील कुदळे, रामभाऊ कुदळे, सोपान कुदळे, गणेश कुदळे, अभिजीत कुदळे, सुहास कुदळे, गौरव कुदळे,श्री कुदळे,आकाश कुदळे,वैभव कुदळे, प्रतीक भूमकर, शंतनूआल्हाट, अक्षय नाणेकर, सोनू कदम,कुणाल सातव,शेखर अहिरराव,राजेंद्र वाघेरे,समीर वाघेरे, मयूर वाघेरे,प्रीतम वाघेरे,विष्णू जाचक, अविनाश गव्हाणे, अमोल गव्हाणे,आशु आसवानी, अमित आसवानी, हरीश आसवानी,राज आसवानी यांच्यासह कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले

Latest News