मा. मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपाला किंमत चुकवावी लागणार – युवराज दाखले

ps logo rgb

पिंपरी -प्रतिनीधी -(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूर या ठिकाणी कार्यकर्ता बैठकीमध्ये मराठवाड्याचे लाडके सुपुत्र मा. मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याविषयी बोलताना “लातूर शहरातून त्यांच्या आठवणी पुसल्या जातील” अशाप्रकारचे बेताल वक्तव्य केलं. या वक्तव्यामुळे फक्त स्व. विलासराव देशमुख यांचे चाहते व समर्थकच नव्हे तर मराठवाड्यातील सर्वच राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना व सर्वसामान्य नागरिकांचे मनही दुखावले आहे. या वक्तव्याचा शिवशाही व्यापारी संघ व मराठवाडावासियांच्या वतीने तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करतो.

दिवंगत विलासराव देशमुख हे महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अभिमान व आदर्श होते.

त्यांनी सर्वपक्षीयांसाठी व सर्वसामान्य जनतेसाठी काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या आठवणी सर्वसामान्य मराठवाडावासीयांच्या मनातून पुसणे कोणत्याही येरागबाळ्याचे काम नाही.
रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या या वक्तव्याची किंमत भारतीय जनता पक्षाला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आणि भविष्यातही चुकवावी लागणार आहे.

तसेच मराठवाडावासीय या वक्तव्याचे कधीही समर्थन करणार नाहीत व त्यांना त्यांची जागा मतदानाच्या रूपाने दाखवतील असं मत
दाखले यांनी व्यक्त केले आहे.

Latest News