पिंपरी गावचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी राष्ट्रवादीच्या पॅनलला संधी द्या…

sandip

पिंपरी दि. 5 ( प्रतिनिधी) (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)जबाबदारीची जाणीव असणारी माणसे फारशा प्रश्नोत्तराच्या फंदात न पडता समोरील काम कसं पूर्ण करता येईल यासाठी प्रयत्न सुरू करतात. याचउक्तीप्रमाणे यापुढे काम करायचे ठरविले आहे. गेल्या पाच वर्षात पिंपरी गावचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न आपण केला आहे. हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी आणि उरलेली विकास कामे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलला प्रभाग क्रमांक 21 मधून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 चे उमेदवार संदीप वाघेरे यांनी येथे केले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रभाग क्रमांक 21 मधून माजी नगरसेवक संदीप वाघेरे,डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे, निकिता कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पॅनलच्या प्रचारार्थ तपोवन मंदिर परिसर, बाल गोपाल विद्यालय, शिवदत्त नगर, धर्मा अपार्टमेंट, कुदळे पाडाळ भागात प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचारफेरीस उदंड प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी सुवासिनींनी संदीप वाघेरे यांच्यासह पॅनलच्या सर्व उमेदवारांचे औक्षण करून, पेढे व साखर भरवून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी वाघेरे यांनी मतदारांशी संवाद साधला. गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांची आठवण करून दिली. बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. मात्र गावचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलून टाकण्यासाठी राष्ट्रवादीच्या पॅनलला विजयी करण्याचे आवाहन वाघेरे यांनी केले.
या प्रचार फेरीत पीसीएमटी चे माजी सभापती संतोष कुदळे, पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाच्या माजी सभापती गिरिजा कुदळे, शेखर अहिरराव,प्रवीण कुदळे, राकेश मोरे,अनिल रसाळ, अर्जुन कदम,विशाल कांबळे, अक्षय कदम, ईश्वर कुदळे, मिकी मान्दन, मयूर बोडगे,शरद कोतकर,हरेश पारखे,राजेंद्र वाघेरे, हनुमंत वाघेरे, अमोल गव्हाणे, राकेश मोरे,सतीश वाघेरे,अनिल रसाळ,संकेत भालेराव,प्रीतम वाघेरे सहभागी झाले होते.

Latest News