पिंपरी चिंचवड शहराला पुन्हा एक नंबर करण्यासाठी भाजपला मत द्या – ॲड. नितीन लांडगे

Backup_of_Backup_of_ps logo rgb

पिंपरी, पुणे (दि. ०९ जानेवारी २०२६) (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकासदर ७ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य सेवा, उद्योग, औद्योगिक उत्पादन, शिक्षण, संशोधन आणि शेती क्षेत्रामध्ये देशात एक नंबर वर आहे. आमदार महेश दादा लांडगे यांचे नेतृत्वाखाली विकासाचा हा वेग पिंपरी चिंचवड शहरात देखील मागील ९ वर्षात शहरातील नागरिकांनी अनुभवला आहे. आता पिंपरी चिंचवड शहराला पुन्हा एक नंबर करण्यासाठी भाजपला मत द्या असे आवाहन ॲड. नितीन लांडगे यांनी केले.
भोसरी गावठाण आणि परिसराचा बदललेला चेहरा मोहरा आणि मोठ्या प्रमाणात विकसित झालेले विकास प्रकल्प आणि त्यातून शहराचा वाढलेला नावलौकिक पाहता, पुन्हा भोसरी गावठाण प्रभाग क्रमांक ७ मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संतोष ज्ञानेश्वर लोंढे (अ), प्रा. सोनाली दत्तात्रय गव्हाणे (ब), राणीमाई अशोक पठारे (क) आणि ॲड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे.
भोसरी गावठाण मधील भाजपा उमेदवारांनी दिघी रोड सँडविक कॉलनी, माळी आळी गावठाण, शितल बाग सोसायटी, नेलगे पगारिया सोसायटी येथील परिसरात घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधला त्यांना प्रचार पत्र देऊन भाजपाच्या कमळ चिन्ह पुढील बटन दाबून संपूर्ण पॅनलला बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन संतोष लोंढे यांनी केले.
यावेळी अशोक लांडे, हिरामण लांडगे, सूरदास फुगे, बाबू खराबे, संदीप गवारे, श्रीकांत लांडगे, माऊली भोपते, बाळासाहेब लांडे, माजी नगरसेवक सखाराम डोळस, गोपीकृष्ण धावडे, बाळासाहेब लांडगे, अशोक लांडे, संकेत लांडे, आप्पा खराबी, बाबू खराबे, अंकुश लोंढे, संतोष फुगे, शंकरराव लांडगे, राहुल शंकर लांडगे, काळुराम लांडगे, दिलीप गाढवे, संजय पठारे, कलावती लांडगे, सुनीता लांडगे, बायडाबाई टिंगरे आदी उपस्थित होते.

Latest News