निळी आणि लाल पूररेषेची फेरसर्वेक्षण करून नव्याने आखणी होणार:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Backup_of_Backup_of_ps logo rgb

कोल्हापूरच्या धर्तीवर “फ्लड मेटिगेशन मेजर्स”नुसार पूररेषेसाठी नवा युडीसीपीआर ; मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांना मोठा दिलासा

आमदार शंकर जगताप यांनी उपस्थित केला पूररेषेचा मुद्दा:   मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा

निळ्या आणि लाल पूररेषेचा प्रश्न कायमचा निकालात काढणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

पिंपरी चिंचवड 9 जानेवारी (प्रतिनिधी): (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पिंपरी चिंचवड सहित संपूर्ण महाराष्ट्रमध्ये  फेर सर्वेक्षण करून निळी आणि लाल पूररेषा नव्याने आखणी करण्यात येणार आहे. “फ्लड मेटिगेशन मेजर्स”नुसार कोल्हापूरच्या धर्तीवर नवा डीसीपीआर केला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकुर्डी येथील सभेत शनिवारी सांगितले.

पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या अधिकृत उमेदवारांसाठी आकुर्डी विठ्ठल मंदिर येथे शनिवारी (दि १०) मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत सभा पार पडली . निवडणूक प्रचार प्रमुख शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे उमा खापरे ,शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यावेळी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, निळी आणि लाल पूररेषेचा प्रश्न युनिफाईड डीसीपीआरमुळे निर्माण झाला. यातील काही तरतुदींमुळे तांत्रिक अडचण आली आहे. नदी लगतच्या अनेक भागांमध्ये नवीन डेव्हलपमेंट थांबलेली आहे. निळी आणि लाल पुररेषा हा 100  वर्षांपूर्वीच्या गृहीतकांवर आधारित आहे. त्या वेळच्या पूररेषेच्या मार्किंगनुसार ही रेषा ठरली होती . या संदर्भात अनेक तक्रारी नागरिकांकडून येत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले कोल्हापूरमध्ये निळ्या आणि लाल पूररेषे संदर्भात नव्याने डीसीपीआर करण्यात आला. या आराखड्यानुसार एखाद्या परिस्थितीमध्ये पूर संभाव्य स्थिती उद्भवली तर कशा पद्धतीचे बांधकाम असले पाहिजे. याबाबत नवीन  नियम केले आणि हे नियम लोकांनी स्वीकारले . त्या पद्धतीने बांधकामे केली. पिंपरी चिंचवडमध्ये ज्या भागात निळी आणि लाल पुररेषा संदर्भात प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी सॅटॅलाइट इमेजचा वापर करून, जीआयओ स्पेशल डेटाचा वापर केला जाणार आहे. “फ्लड मिटीगेशन सिस्टिम”चा वापर केला जात आहे. पुढच्या काळात युनिफाईड डीसीपीआरमध्ये देखील बदल केला जाईल. आणि पिंपरी चिंचवड शहरातील निळी व लाल पुर रेषेसंदर्भातला प्रश्न कायमचा निकालात काढण्यात येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.

नदी संवर्धन, प्रॉपर्टी कार्डचा मुद्दा प्राधान्याने सोडवणार

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले पवना मुळा आणि इंद्रायणी नदीच्या संवर्धनासाठी आपण 2300 कोटीचा प्रकल्प तयार केला आहे. गेल्या पंचवीस तीस वर्षात रखडलेला शहराचा साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न सोडवल्याचे सांगितले तसेच लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या मागणीप्रमाणे शास्तीकारदेखील पूर्वलक्षी प्रभावाने रद्द केला. प्राधिकरण बाधित जमिनींचा फ्री होल्ड चा प्रश्न भाजपाच्या माध्यमातून सोडविल्याचे सांगितले. अग मी काळात प्रॉपर्टी कार्ड चा मुद्दा देखील प्राधान्याने सोडवणार असून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणाले. आगामी काळात मेट्रोचे विस्तारीकरण मोठ्या प्रमाणात केले जाईल तिसरी मेट्रो या शहराला देण्यात येणार आहे. विकास आराखड्यातील रस्ते आपण मोठे करत आहोत. एलिवेटेड कॅरीडोर, उड्डाणपूल,  अंडर पास या माध्यमातून वाहतूक सुलभ केली जात आहे.   


मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांना उत्तर

भाजपने केलेल्या कामांची गुणवत्ता गेल्या 25 वर्षातील कामांच्या तुलनेत सरस आहे. 15 वर्ष जेएनएनयुआरएम अंतर्गत स्वस्तातील घरांचे बांधकाम रखडले होते.  13 हजार घरांपैकी केवळ 6 हजार 700 घरे विरोधकांना पूर्ण करता आली. मात्र 2017 पासून भाजपच्या सत्ता काळात पिंपरी, बोऱ्हाडेवाडी, चर्होली ,  डुडुळगाव या भागांमध्ये 20 हजार घरांची निर्मिती भाजपच्या माध्यमातून झाली. या घरांची गुणवत्ता विरोधकांनी एकदा पाहून घ्यावी. 

जीसीसी हबमुळे पिंपरी चिंचवड विकासाच्या केंद्रस्थानी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले यापूर्वी पुणे जिल्हा म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग, टेक्नॉलॉजीचे हब होता. मात्र आगामी काळात पुणे जिल्हा हा जीसीसी हब म्हणून …

Latest News