पिंपरी महानगरपालिका प्रशासकीय इमारतीस अजितदादा पवार यांचे नाव तसेच प्राणांगणात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा – योगेश बहल

पिंपरी चिंचवड महानगरपालिका नवीन अत्याधुनिक प्रशासकीय इमारतीस स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव तसेच प्राणांगणात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा – योगेश बहल
राज्याचे मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री याचे कडे केली मागणी..
पिंपरी चिंचवड शहरासाठी मा.ना.श्री. अजितदादा पवार यांनी दिलेले योगदान लक्षात घेता पिंपरी चिंचवड महानगरपालिका नवीन अत्याधुनिक प्रशासकीय इमारतीस स्वर्गीय अजितदादा पवार भवन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असे नामकरण देण्यात येऊन तेथील प्राणांगणात त्यांचा पूर्णा कृती पुतळा उभारण्यात यावा, ही भावना पिंपरी चिंचवड शहरातील शहरवासीयांची आहे.
सन १९९२ ते २०१७ या २५ वर्षांच्या कालावधीत या औधोगिक नगरीला अग्रगण्य सर्व सुख सोयी युक्त स्वच्छ व सुंदर शहर म्हणून ज्यांनी या शहराची ओळख निर्माण केली. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सामान्य जनतेची गरज लक्षात घेता केंद्र व राज्य शासनाच्या जेएनएनयुआरएम योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी आणून शहरात प्रशस्त रस्ते, उड्डाण पूल, ग्रेड सेप्रेटर, झोपडपट्टी वासियांसाठी पक्की घरे, पाणीपुरवठा करण्यासाठी लक्ष लिटर क्षमता असणाऱ्या पाण्याच्या टाक्या, सायन्स पार्क, ॲटो क्लस्टर, प्रेक्षागृहे, विविध उद्याने, व्यायाम शाळा, आरोग्याच्या दृष्टीने हॉस्पिटल्स, मुलींचे आयटीआय, आदींचा समावेश करून या शहराच्या वैभवात भर घातली, त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते बेस्ट सिटी अवार्ड शहरास प्राप्त झाला.
एकंदरीत शहरातील दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या व व्याप्ती लक्षात घेता अस्तित्वात असलेलेली मनपा इमारत कार्यालयीन कामकाजासाठी अपुरी पडत असल्याने पिंपरी चिंचवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नवीन अशी अत्याधुनिक प्रशस्त महानगरपालिका प्रशासकीय इमारत नागरिकांच्या सोयीसाठी असावी म्हणून त्या इमारतीचे डिझाईन-इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यामध्ये दादांचे मोठे श्रेय व योगदान आहे.
या स्वप्नाची पूर्ती होण्याआधीच दुर्देवाने त्यांचे अपघाती निधन झाल्याने, शहरवासीयांच्यावतीने आदरांजली रूपाने त्यांचे नाव अजराअमर रहावे, याकरिता नवीन प्रशासकीय इमारतीस स्वर्गीय अजितदादा पवार भवन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असे नामकरण देण्यात येऊन तेथील प्राणांगणात त्यांचा पूर्णा कृती पुतळा उभारण्यात यावा, ही पिंपरी चिंचवड शहर वासीयांची इच्छा आहे.
अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पिंपरीचिंचवड शहरावासीयांच्या वतीन करण्यात आली आहेत
