तामिळनाडूत (TVK) थलपती विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ….

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) तामिळनाडूच्या राजकारणात एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके)च्या पक्षाचे प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी १० मे २०२६ रोजी तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडियममध्ये एक भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. यवेळी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी विजय यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. विजय यांच्या विजयाचे पडसाद केवळ भारतातच नव्हे, तर शेजारी देश श्रीलंकेतही उमटले आहेत.
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमापा दिसानायके यांनी विजय यांचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. राष्ट्रपतींनी एक्सवर पोस्ट करत आपल्या संदेशात म्हटले की, तामिळनाडू आणि श्रीलंकेचे नाते कुटनीतिक नसून, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भावनिक आहे. भारत आणि श्रीलंकेची भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी, आर्थिक विकासासाठी आम्ही नव्या मुख्यमंत्र्यांसोबत काम करण्यास उत्सुक आहोत असे कुमारा दिसानायके यांनी म्हटले.
टीव्हीके या पक्षाने तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत मोठा करीश्मा दाखवत १०८ जागा जिंकल्या. तमिळनाडूमध्ये पन्नास वर्षांपासून असलेली डीएमके आणि एआयडीएमके या पक्षांना पर्याय म्हणून जोसेफ विजय यांचा टीव्हीके पक्ष उभा राहिला आहे. या पक्षाला बहुमत गाठता आलं नव्हतं. दरम्यान आता १२१ सदस्यांचा पाठिंबा असल्याचं पत्र विजय यांनी राज्यपालांना दिलं. ज्यानंतर तमिळनाडूच्या मुख्यमंत्री या पदावर जोसेफ विजय विराजमान झाले आहेत. मुख्यमंत्री होताच त्यांनी तीन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
जोसेफ विजय यांनी कुठले तीन निर्णय घेतले?
२०० युनिट मोफत वीजः तमिळनाडूतील जनतेला मोठा दिलासा देत विजय यांनी राज्यातील प्रत्येक घरासाठी २०० युनिटपर्यंत मोफत वीज पुरवण्याची घोषणा केली आहे. सामान्यांच्या खिशाला कात्री लागू नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
अंमली पदार्थ विरोधी ‘स्पेशल टास्क फोर्स’: राज्यातील तरुण पिढीला अमली पदार्थांच्या
विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि ड्रग्स तस्करीचे कंबरडे मोडण्यासाठी एका विशेष कृती दलाचीस्थापना करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. ‘ड्रग-फ्री तमिळनाडू’ हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असेल.
