गणेशोत्सवासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय शहरातील काही भागांत मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश….

daru

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)

  • खडक, विश्रामबाग, फरासखाना हद्दीत विशेष निर्बंध विशेषतः खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान मद्यविक्री बंद राहणार आहे. या तीन पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील मद्यविक्रीची दुकाने, बार तसेच परमिट रूममध्ये या काळात मद्यविक्री करता येणार नाही. दरम्यान, २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघणार असल्याने संबंधित भागात मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे.
  • मिरवणुकांच्या समाप्तीपर्यंत निर्बंध लागू – २६ सप्टेंबर रोजीही विसर्जन मिरवणुका पूर्ण होईपर्यंत संबंधित परिसरात मद्यविक्री सुरू करता येणार नाही. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशानुसार निर्बंधांचा कालावधी मिरवणुकांच्या प्रत्यक्ष समाप्तीपर्यंत लागू राहणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात शहरातील प्रमुख रस्ते आणि मिरवणूक मार्गांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यातच विसर्जन मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू राहण्याची शक्यता असते. या काळात मद्यपानामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, वाहतूक व्यवस्थेत अडथळे येऊ नयेत आणि उत्सव शांततेत पार पडावा, या उद्देशाने मद्यविक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
  • आदेशाचे पालन न केल्यास कारवाई – प्रशासनाने संबंधित मद्यविक्री आस्थापनांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे. आदेशाचे उल्लंघन करून मद्यविक्री केल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून, नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गणेशोत्सव निर्विघ्न आणि शांततेत पार पडावा, तसेच उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी प्रशासनाने पुणे शहरातील मद्यविक्रीवर निर्बंध घातले आहेत. गणेश चतुर्थी, विसर्जन मिरवणुका आणि अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर

जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित परिसरातील दारूची दुकाने, बार आणि परमिट रूमना या कालावधीत मद्यविक्री करता येणार नाही. गणेश चतुर्थीच्या दिवशी, १४ सप्टेंबर रोजी पुणे शहरात मद्यविक्री बंद राहणार आहे. याशिवाय गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी ज्या मार्गांवरून गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुका जाणार आहेत, त्या मार्गांवरील संबंधित परिसरातही मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे. उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडत असल्याने गर्दीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

Latest News